पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०५ जुन २०२१
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कमला नेहरू हॉस्पिटल, मंगळवार पेठ येथे समस्त रुग्णांना फळ वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या वतीने करण्यात आले होते.
फळ वाटप कार्यक्रम पुरुष सर्जिकल, महिला मेडिकल, महिला सर्जिकल, पुरुष मेडिकल, फिजिओथेरपी विभाग येथील तब्बल ३५० रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. पुणे शहर इंदिरा काँग्रेस कमिटीचे संस्थापक ज्येष्ठ नेते शामराव अर्जुनराव पवार यांच्या शुभहस्ते फळ वाटप करण्यात आले. या फळ वाटप कार्यक्रमाबरोबरच कमला नेहरू रूग्णालय या ठिकाणी असलेले समस्त कर्मचारी स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांचा देखील त्यांनी आजवर केलेल्या अविरत सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.
अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी प्रथमच करण्यात आला असून त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी देखील आभार व्यक्त केले. तसेच पुणे शहरातील पूर्व भागामध्ये कमला नेहरू रुग्णालय येथे काम चालू असलेले स्व.मातोश्री पद्मावती कृष्णा शेट्टी आयसीयू केंद्राची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी, कमला नेहरू हॉस्पिटल चे सुप्रीडेन्ट लता त्रिंबके, असिस्टंट सुप्रीडेन्ट मंदार नागमोडे, रुग्णालयाचे सचिव श्रीकृष्णा सकट, इक्बाल शेख, अक्षय गायकवाड, मुमताज शेख, अमर शामराव पवार, वसीम शेख, हरीश अय्यर, विशाल शिंदे ,सतीश चव्हाण, मंगेश भरत साखरे, सुलतान शेख, अशोकराव चव्हाण, नूरुद्दीन अन्सारी, राहुल चव्हाण, इक्बाल शेख, राजू शेख, सचिन शेंडगे, अश्विनी मित्र मंडळ आणि सदानंद शेट्टी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाची काळजी घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.
Nice