DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

माजी CM विजय रुपाणींचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत अंत!

लेकाचा शेवटही अपघातातच झाला होता.

DD News Marathi by DD News Marathi
June 13, 2025
in ताज्या बातम्या, राजकीय
0
माजी CM विजय रुपाणींचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत अंत!

अहमदाबाद प्रतिनिधी :
दि. १३ जून २०२५

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 200 हून अधिक प्रवाशांचे दुर्दैवी निधन झाले आहे. विजय रुपाणी यांच्या निधनाच्या वृत्ताला गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दुजोरा दिला आहे. गृहमंत्री अमित शाहही तातडीने गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या धाकट्या मुलाचेही कार अपघातात निधन झाले होते.

रूपाणींच्या मुलाचेही अपघाती निधन झाले होते –

विजय रुपाणी हे आपल्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते मात्र विमान अपघातात त्यांचे निधन झाले. विजय रुपाणी यांचा भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या अंजली यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुले होती. त्यातील धाकटा मुलगा पुनीत याचे कार अपघातात निधन झाले. पुनीत हा त्यावेळी अवघ्या तीन वर्षाचा होता. त्यानंतर दांम्पत्याने त्याच्या नावाने एक ट्रस्ट सुरू केली. ज्याद्वारे ते लोकांना सहाय्य करत होते. त्यांची मुलगी राधिका ही सीए असून लंडनमध्ये स्थायिक आहे. तर मुलगा इंजिनिअर आहे.

विजय रुपाणींनी 2016 ते 2021 या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्रीपद भुषविले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने 2017 ची गुजरात विधानसभा निवडणूक लढवली होती. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. त्यानंतर विजय रुपाणींनाच मुख्यमंत्रीपदी भाजप केंद्रीय नेतृत्त्वाने कायम ठेवले होते. 2021 मध्ये विजय रुपाणी यांच्या जागी मुख्यमंत्रीपदी भूपेन पटेल यांची नियुक्ती भाजपने केली.

1970 मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता. अभाविप, जनसंघ आणि आरएसएसशी ते जोडले गले. आणिबाणीच्या काळातही त्यांनी 11 महिने तुरूंगवास भोगला. 90 च्या दशकात ते राजकोटचे महापौर होते. पुढे त्यांनी राजकोट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2006 ते 2012 मध्ये भाजपचे ते राज्यसभा सदस्य होते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Ahemadabad#PlaneCrash#VijayRupani
Previous Post

बारामती निवडणुकीत चिन्हासाठी रस्सीखेच!

Next Post

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

Next Post
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

July 30, 2025
एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

July 29, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.