DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

घरातच तडफडून दोघांचा मृत्यू.

DD News Marathi by DD News Marathi
June 14, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

जळगाव प्रतिनिधी :
दि. १४ जून २०२५

गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने आगमन केले आहे. अनेक ठिकाणी अपघात होऊन काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशातच जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घरात कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारेमध्ये वीज प्रवाह उतरल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तासखेडा इथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. समाधान कोळी आणि मानवी कोळी असं मृत्यू झालेल्या पिता-पुत्रीचं नाव आहे. या घटनेमुळे कोळी कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात कपडे वाळत घालण्यासाठी कोळी कुटुंबीयांनी तार बांधली होती. या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. पण याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. समाधान कोळी यांचे वडील अशोक कोळी हे तारेवरून रुमाल काढण्यासाठी गेले असता विजेचा धक्का बसून ते फेकले गेले आणि तार तुटली. याच तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने समाधान कोळी यांना विजेचा जोरदार झटका लागला. यावेळी घरात खेळत असलेली त्यांची मुलगी मानवी हिनेही वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बाबांची तडफड पाहून अनवधानाने त्यांना स्पर्श करण्यास गेलेल्या मानवी हिलाही विजेचा जोरदार धक्का लागला.

विजेचा जबर धक्का लागल्यामुळे दोघांनीही जागीच प्राण सोडले होते. मात्र त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. बाप लेकीला विजेच्या धक्क्यामुळे मरण आल्यामुळे सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोयना धरण परिसरात तुफान पाऊस, शिंदेंचा ताफा थांबला, अखेर बोटीने दरे गावापर्यंत प्रवास!

जळगावात पावसाचा कहर
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील सहा महिन्यांतील एप्रिल, मे व जून महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळासह झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल २७ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या १५ हजार ४११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकत्याच बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने देखील ४ हजार हेक्टरवरील फळ पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #HeavyRain#LightningJlgaon
Previous Post

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

Next Post

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

Next Post
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

December 9, 2025
कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.