DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

कृष्णांग जोशी देशात तिसरा तर आरव अग्रवाल दहावा.

DD News Marathi by DD News Marathi
June 16, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी
0
‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १६ जून २०२५

वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले असून पहिल्या दहांत राज्यातील दोन विद्यार्थी झळकले आहेत. कृष्णांग जोशी देशातून तिसरा तर आरव अग्रवाल दहावा आला आहे. राजस्थानचा महेश कुमार देशात पहिला आला. मुलींमध्ये नवी दिल्लीची अविका अगरवाल देशात पहिली आली.

राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) ४ मे रोजी देशविदेशातील एकूण ५ हजार ४६८ केंद्रांवर ‘नीट’ परीक्षा घेतली होती. देशभरात ‘नीट’ दिलेल्या सुमारे २० लाख विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण २ लाख ४८ हजार २०१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि यापैकी १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. २०२४ मध्ये ही नोंदणी केलेल्यांची संख्या २ लाख ८२ हजार ५१ होती. त्यापैकी २ लाख ७५ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १ लाख ४२ हजार ८२९ विद्यार्थी पात्र ठरले होते. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये राज्यातील पात्र विद्यार्थी संख्येत १७ हजार १०२ ने घट झाल्याचे दिसून आले आहे.

विद्यार्थ्यांचा वरचष्मा –
‘नीट’ मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या २० मुलींच्या यादीत सिद्धी बढे हिने तिसरा (अखिल भारतीय क्रमांक २६), उर्जा शहा हिने पाचवा (अखिल भारतीय क्रमांक ३१), इश्मित कौर हिने बारावा क्रमांक (अखिल भारतीय क्रमांक ८५) पटकावला आहे. तसेच, २० मुलांच्या यादीत उमेद खान याने एकोणिसावा क्रमांक (अखिल भारतीय क्रमांक २१) पटकावला आहे. ही परीक्षा इंग्रजीप्रमाणेच मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, आसामी, कन्नड, उडिया, मल्याळम, तेलगू, पंजाबी, तामिळ, उर्दू अशा तेरा भाषांमध्ये घेण्यात आली.

विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी https://neet.nta.nic.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल. परदेशात अबूधाबी, दुबई, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, कुआलालंपूर, कुवेत, लागोस, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर या देशांमध्ये नीटचे परीक्षा केंद्र होते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #KrushnangJoshi#NEET
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

Next Post

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

Next Post
गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.