रायगड प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०५ जुन २०२१
गेल्या वर्षीचे “निसर्ग” आणि यावर्षीचे “तोक्ते” चक्रीवादळ या दोन्ही चक्रीवादळांनी कोकणातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान केले. मात्र हे महाविकास आघाडीचे शासन सदैव कोकणातील जनतेच्या सोबत आहे. कोकणातील विकासकामांना नेहमीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्रीवर्धन येथे केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौकात श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामाचे तसेच श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन संपन्न झाले. त्यानंतर येथील र.ना.राऊत हायस्कूलच्या प्रांगणातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे तर पालकमंत्री कु.आदिती तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, श्रीवर्धन नगर परिषद नगराध्यक्ष फैसल मियाजान हुर्जुक, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, मुख्याधिकारी किरण मोरे, पाणीपुरवठा जलनि:सारण व अपंग कल्याण समिती सभापती किरण केळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.दिशा नागवेकर, क्रीडा व युवक कल्याण समिती सभापती सौ.रहमत आराई, स्वच्छता वैधक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सौ.गुलाब मांडवकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती वसंत यादव, नगरसेवक, नगरसेविका सर्वश्री जितेंद्र सातनाक, श्रीमती सीमा गोरनाक, श्रीमती कामिनी रघुवीर, शबिस्ता सरखोत, अनंत गुरव, प्रितम श्रीवर्धनकर, श्रीमती अंतिम पडवळ, श्रीमती प्रतिक्षा माळी, श्रीमती मीना वेश्विकर, स्वीकृत नगरसेवक अब्दुल कादिर काशीम राऊत, सुनिल पवार, गटनेता बबन चाचले व दर्शन विचारे आदि उपस्थित होते.