DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भारताची चेस क्वीन बनली नागपूरची दिव्या देशमुख!

वर्ल्ड नंबर 1 ला हरवण्याचा पराक्रम! PM मोदींकडून कौतुक!

DD News Marathi by DD News Marathi
June 20, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या, प्रेरणादायी
0
भारताची चेस क्वीन बनली नागपूरची दिव्या देशमुख!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी
दि. २० जून २०२५

भारताची ‘चेस क्वीन’ अशी ओळख असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखच्या कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक टीम रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने महिला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चीनच्या होऊ यिफानला पराभूत केले.

जागतिक ज्युनियर क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिव्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. या स्पर्धेत दिव्याने एकूण तीन बक्षिसे पटकावली. दिव्याच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ‘एक्स’वर या सामन्याची छायाचित्रे शेअर करीत तिचे कौतुक केले. “दिव्याच्या यशातून तिची जिद्द आणि दृढनिश्चय दिसून येतो. तिची कामगिरी देशातील अनेक युवा बुद्धिबळपटूंनाही प्रेरणा देणारी ठरेल. तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,” असे पंतप्रधानांनी या संदेशात म्हटले आहे.

वुमन ग्रॅण्डमास्टर असलेल्या १९ वर्षीय दिव्याने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील उपांत्य सामन्यात उत्कृष्ट व आक्रमक चाली खेळून सर्वांना आश्चर्यचकित कामगिरी केली. दिव्याने ७४ चालींमध्ये तीन वेळा ‘ वर्ल्ड चॅम्पियन ‘ राहिलेल्या यिफानला पराभूत केले. मात्र, निर्णायक लढतीत दिव्याचा उझबेकिस्तानची महिला फिडेमास्टर निलोफरखान इमोमकुझिव्हाने पराभव केला.

गेल्या वर्षी बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दिव्याचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर दिल्ली येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभातही मोदींनी दिव्याचे कौतुक केले होते.

डी. गुकेशची आठवण…
काही दिवसांपूर्वी भारताचा युवा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेश याने नॉर्वे चेस स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते. दिव्या आणि यिफान यांच्यातील हा सामना पाहणाऱ्यांना गुकेश आणि कार्लनसची पुन्हा आठवण झाली. या सामन्याच्या शेवटच्या टप्यात यिहानकडून एक छोटीशी चूक झाली. तिने आपला पराभव मान्य केला आणि हस्तांदोलनासाठी दिव्यापुढे आपला हात पुढे केला. यिफानच्या या कृतीवर पहिल्यांदा दिव्याचा विश्वासच बसला नाही. काही क्षण तिने डोळे मिटले. काहीशी भावुक झाली आणि यिफानशी हस्तांदोलन केले. आपली चूक खिलाडूवृत्तीने कबूल करीत यिफानने स्मितहास्य केले आणि ती निघून गेली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BlitzChess#ChessQueen#DivyaDeshmukh#London#NarendraModi#TeamRapidChess
Previous Post

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

Next Post

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन!

Next Post
ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन!

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.