DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्यात सिगारेट ओढणार्‍या पोरांना हटकल्याने हत्या!

पानशेतमध्ये खळबळजनक घटना.

DD News Marathi by DD News Marathi
June 20, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुण्यात सिगारेट ओढणार्‍या पोरांना हटकल्याने हत्या!

पुणे प्रतिनिधी :
दि. २० जून २०२५

पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पानशेत येथे सिगारेट ओढताना हटकल्याने काही पर्यटकांनी एका स्थानिक तरुणाची हत्या केली. आरोपींनी तरुणाच्या छातीवर दगड मारून त्याला संपवले. पोलिसांनी या प्रकरणी १२ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.

रोहिदास काळुराम काटकर (वय २४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कादवे, ता. वेल्हे येथील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी आकाश सुभाष भिसे (वय २१), भागवत मुंजाजी आसुरी (वय २०), रितेश उत्तम जोगदंड (वय २१), उमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय २१) आणि पांडुरंग भानुदास सोनवणे (वय १९) यांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी मूळचे परभणी जिल्ह्यातील असून सध्या ते पुण्यातील नऱ्हे भागात राहतात. ही घटना १५ जून रोजी पानशेत परिसरात घडली.

ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, “आरोपी 15 जून रोजी पानशेत धरणाकडे फिरायला आले होते. सायंकाळी सात वाजता पुण्याकडे परतताना ते एका हॉटेलसमोर सिगारेट ओढण्यासाठी थांबले. यावेळी रोहिदास काटकर याने त्यांना हटकल्याने वाद झाला. या वादातून आरोपींनी रोहिदास याला बेदम मारहाण करत त्याच्या छातीवर जोरात दगड मारला. त्यामुळे रोहिदास याचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी हे काळ्या रंगाच्या मोपेड आणि मोटारसायकलवरून पुण्याच्या दिशेने पळून गेले.

पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. आरोपींची वाहने पुण्यातील नऱ्हेच्या वाल्हेकर चौकात सापडली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता दुचाकी मालकाने आकाश भिसेला वाहन दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आकाश भिसेला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, उपनिरीक्षक अमित देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पानशेत परिसरात या घटनेची चर्चा असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #cigarrette#panshet#punemurder
Previous Post

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन!

Next Post

पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

Next Post
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.