DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून सेवेत.

DD News Marathi by DD News Marathi
June 20, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

पुणे प्रतिनिधी :
दि. २० जून २०२५ :

पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक उद्या शनिवार, २१ जून २०२५ रोजी प्रवासी सेवेत दाखल होत आहे.

खडकी मेट्रो स्थानक हे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्त्वपूर्ण मार्गिकेवर स्थित आहे. हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे व या मेट्रो स्थानकातून प्रवाश्यांना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण शक्य झाले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणे सुलभ होईल.

प्रवाश्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव घेता येईल. हे मेट्रो स्थानक सुरु झाल्यामुळे प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार आहे.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “पुणे मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्याने पुणे व पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली आहे. खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता ठिकाणी राहणाऱ्या व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या स्थानकाचा फायदा होणार आहे,” अशी माहिती हर्डीकर यांनी दिली.

दरम्यान, खडकी मेट्रो स्थानक सेवेत येत असल्याने या परिसरातील प्रवाश्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #khadki#pimrichinchawad#PuneMetroPune
Previous Post

पुण्यात सिगारेट ओढणार्‍या पोरांना हटकल्याने हत्या!

Next Post

पातूरचे नायब तहसिलदार ACB च्या जाळ्यात!

Next Post
पातूरचे नायब तहसिलदार ACB च्या जाळ्यात!

पातूरचे नायब तहसिलदार ACB च्या जाळ्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.