नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. २१ जून २०२५
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी भीषण विमान अपघातानंतर आता एअर इंडियाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अर्थात DGCA ने अहमदाबाद विमान अपघातामध्ये सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांविरोधात करावाई करत त्यांना काढण्याचे आदेश दिले आहेत.
क्रू रिस्टोरिंगचे प्रभारी असलेल्या एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. वैमानिकाच्या विमान उड्डाणाच्या वेळेच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल ३ क्रू अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली आहे.
फ्लाइट क्रू शेड्यूलिंगशी संबंधीत गंभीर आणि सतत उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अनिवार्य परवानाबाबत तसंच विश्रांती आणि इतर निकष पूर्ण न करता विमान कर्मचाऱ्यांचं वेळापत्रक आणि उड्डाण निश्चित करण्यात आलं होतं. DGCA ने सुरक्षा उल्लंघनांची गंभीरता पाहता एअर इंडियाच्या दोषी कर्माचार्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.