DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘तो माझा क्रश होता आणि…’ झीनत अमान यांनी गुपित उलगडलं!

पहिल्याच किसिंग सीनमुळे झाला होता गदारोळ.

DD News Marathi by DD News Marathi
June 25, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
‘तो माझा क्रश होता आणि…’ झीनत अमान यांनी गुपित उलगडलं!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ जून २०२५

झीनत अमान सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि त्यांच्या भूतकाळाशी, सिनेमाशी संबंधित किस्से शेअर करतात. झीनत अमान यांनी त्यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमाबद्दल बऱ्याच वेळा भाष्य केलं आहे. अशातच आता त्यांनी या सिनेमातील गाण्याचा व्हिडिओ शेअर केला असून या गाण्यातील किसिंग सीनचा किस्सा सांगितला आहे. झीनत यांनी सांगितलं की, त्यांना शशी कपूर यांच्यावर त्या शाळेत असल्यापासून क्रश होता.

झीनत अमान यांनी लिहिलं की, ‘चमकणारे डोळे, देखणं रूप असणाऱ्या शशी कपूर यांच्या प्रत्येक शाळकरी मुली प्रेमात असायच्या. मीसुद्धा त्या मुलींमध्ये होते. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही मी बोर्डिंग स्कुलमध्ये होते. शेक्सपिअर नाटक सादर करण्यासाठी ते त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत पाचगणीला आले होते! आणि त्यांना पाहून सगळ्याच मुली भारावून गेल्या.’

‘माझ्या नशिबानं, शशी दक्षिण मुंबईचे रहिवासे होते आणि माझ्यापासून फार दूर राहात नव्हते. शेजारी म्हणायचे की, संध्याकाळी ६ वाजता शशी कपूर यांना फिरण्याची सवय होती. मी आणि माझ्या मैत्रिणी संपूर्ण हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये घरच्यांना हे पटवून द्यायचो की, संध्याकाळची हवा किती चांगली असते. कारण आम्हाला शॉर्ट्समध्ये फिरायला येणाऱ्या शशी कपूर यांना बघायला जायचं असायचं. जेव्हा शशी आणि मी एकमेकांना भेटलो तेव्हा मला जाणवलं की ते हुशार, आकर्षक आणि एक चांगला माणूस आहेत. आम्ही रोटी, कपडा और मकान, चोरी मेरा काम आणि वकील बाबू सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.’ असं झीनत यांनी पुढे म्हटलंय.

सत्यम शिवम सुंदरम सिनेमाबद्दल सांगताना झीनत अमान म्हणाल्या की, ‘मला माहित आहे की, मी ‘सत्यम शिवम सुंदरम’ बद्दल आधीच बरंच काही कव्हर केलं आहे. पण मला ही क्लिप तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली कारण दोन कारणांमुळे. पहिलं म्हणजे, माझ्या कारकिर्दीतील हा एक मोठा क्षण होता. हा माझा पहिला ऑनस्क्रीन किसिंग सीन होता, जरी त्यामुळे त्यावेळी गोंधळ निर्माण झाला होता, पण प्रत्यक्षात त्यामध्ये प्युरिटी होती. त्याचं शूटिंग करताना मला क्षणभरही अस्वस्थ वाटलं नाही. दुसरं कारण म्हणजे झीनतचं शाळेतील प्रेम सेल्युलॉइडवर प्रत्यक्षात येऊ शकतं अशी पोस्ट करण्याची हिंमत मिळाल्यानं खूप आनंद झाला आहे. शशी कपूर अद्भुत माणूस होता आणि आमच्या परिसरातील पृथ्वी थिएटरच्या रूपात त्याचा वारसा जिवंत आणि भरभराटीला येत असल्याचं पाहणं खरोखरच खास आहे.’

बातमी नक्की शेअर करा
Tags: #KissingScene#rajkapoor#satyamshivamsundaram#zeenataman
Previous Post

मेकअप करून बळेच भाकऱ्या भाजायच्या अन् शोऑफ करायचा!

Next Post

महाराष्ट्रात पाऊस काहीसा विसावला, पण…

Next Post
महाराष्ट्रात पाऊस काहीसा विसावला, पण…

महाराष्ट्रात पाऊस काहीसा विसावला, पण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.