पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०६ जुन २०२१
आज शिवराज्यभिषेक दिनामिमित्त नऱ्हे वासियांसाठी शिवराज्य समुहातर्फे मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात न-हे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करुन घेतली.
कोरोना काळात आरोग्याची समस्या गंभीर बनली आहे, त्यामूळे शिवराज्य समुहाचे संस्थापक अध्यक्ष भुपेंद्र मोरे यांनी या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आरोग्याचे शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक आण्णा मोकाशी, खडकवासला मतदारसंघाचे उपाध्यक्ष शरद दबडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती पोकळे, माजी नगरसेवक विकासनाना दांगट, शिवसेनेचे विभागप्रमुख निलेश गिरमे व ह.भ.प. यप्रे महाराज आदी मान्यवार उपस्थित होते.
या प्रसंगी प्रशांत जगताप म्हणाले, “कोरोना संकट आणि नागरिकांचे आरोग्य या सर्वांचा विचार करुन भुपेंद्र मोरे यांनी या अतिशय महत्वाच्या दिवशी चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ही चांगली गोष्ट आहे. भुपेंद्र मोरे हे न-हे परिसरात नेहमी सामाजहिताचे उपक्रम राबवित असतात. त्यांच्या विधायक कामांची आज खरंच समाजाल गरज आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनास शुभेच्छा आहेत. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो.”
भुपेंद्र मोरे म्हणाले, “माझ्या कोणते ही पद नसताना मी परिसरातील नागरिकांसाठी अनेक उपक्रम सतत राबवित असतो. कोरोना महामारी मध्ये मी व माझ्या टिमने प्रचंड काम केलं आहे. आज शिवराज्याभिषेक दिन आहे, तेंव्हा आजच्या विशेष दिवशी, नागरिकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. आजच्या शिवराज्याभिषेक दिनी काही तरी चांगला कार्यक्रमाचे आयोजन केल्याने आजचा दिवस सार्थक झाल्यासारखे वाटत आहे.”
उपस्थित इतर मान्यवरांनी भुपेंद्र मोरे यांना त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या शिबिरास डॉ. भादाने व त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले.