मुंबई प्रतिनिधी :
दि. २६ जून २०२५
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सियस घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाने विसावा घेतला आहे. मात्र येत्या पाच दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर होऊ शकतो. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील दडी मारलेला पाऊस गुरुवारी सुरू झाला त्याच्यामुळे बळीराजासाठीही आनंदाची बातमी आहे. काही जिल्ह्यांमध्ये मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
पश्चिम आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये गडगडाटी वादळांसह, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे आणि गैरसोय टाळण्यासाठी घराबाहेर जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी कमाल तापमान ३४.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले, तर किमान तापमान २३ अंश सेल्सियसच्या आसपास राहिले. राष्ट्रीय राजधानीतील रहिवाशांना आगामी दिवसांमध्ये हलका वारा आणि अधूनमधून गडगडाटी वादळांचा अनुभव येण्याची शक्यता आहे.