फलटण प्रतिनिधी : निकेश भिसे
दि. २६ जून २०२५
हजारो वर्षांपासून चालत आलेल्या उच्च नीचतेला नष्ट करून एक नवा भारत, नवा समाज, जो समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय यांवर आधारित आहे, निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती.
राज सत्तेची सूत्रे हाती आल्यानंतर सर्व प्रथम रंजल्या, गांजल्या, दीन, दुबळ्यांचे तसेच राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांचे राहिलेले अपूर्ण काम हाती घेवून आपल्या राजेशाहीला लोकशाहीचे स्वरूप देऊन नवा समाज नवा देश शाहू महाराजांनी घडवीला. हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेला, समाजातील भेसुर विषमतेला , मनूला , प्रथम त्यांनी मूठ माती दिली आणि समाजात समता स्थापित केली. त्याच बरोबर अनमोल असे शैक्षणिक कार्य केले. अनेक वसतीगृहे, समाजासाठी बोर्डिंग निर्माण केले. शैक्षणिक कार्याचा असा परिणाम झाला की ज्या मुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून अनेक पदव्या घेऊन भारताची राज्यघटना निर्माण करू शकले, तसेच शाहु महाराजांच्या विचारांचा खूप मोठा परिणाम, पगडा म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा यांनी हजारो कॉलेज, बोर्डींग चालू केली. दलित , शेतकरी मुलांना मोफत शिक्षण दिले .
म्हणूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ऐक वेळ माझा जयजयकार करू नका पण राजर्षी शाहू महाराजांचा जयजयकार करा. त्यांची जयंती दिवाळी प्रमाणे साजरी करा. महाराज सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांचे मला साह्य नसते तर मी शिक्षण असेल, समाज कार्य असेल, पूर्ण करू शकलो नसतो .फार तळमळीने अंतःकरणा पासुन बाबांनी हे शब्द बोलले आहेत, हे आता समाजाने ध्यानी घेतले पाहिजे आणि समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला पाहिजे. शाहू महाराजांचे विचार आत्मसात करुन देश घडीविला पाहिजे. त्यांच्या जयंती निमित्त हीच आपेक्षा!
सर्व भारतीयांना जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा!