सातारा प्रतिनिधी :
दि. २८ जून २०२५
आषाढी वारी २०२५ निमित्ताने पालखी सोहळा सुरु असून आज श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सातारा जिल्ह्यात हरिनामाच्या जयघोषात प्रवेश झाला. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या जनजागृती अभियान अंतर्गत भव्य आणि आकर्षक स्वागत फलक उभारला आहे. या अभियानास माननीय मंत्री महोदय ना.श्री.मकरंद आबा पाटील, खासदार मा.नितीन काका पाटील, सहसचिव मा.संजय इंगळे साहेब, मा.नितीन बापू , मा.उदयसिंह पाटील व इतर मान्यवरांनी भेट दिली.
वारीत उत्साहने सहभाग घेऊन मा. ना. मकरंद आबा पाटील यांनी वारकरी मंडळी सोबत संवाद साधला. सारे वातावरणच वारीमध्ये भक्तिमय होऊन जाते. विठूनामाचा जयघोष सर्वत्र दुमदुमत असतो. या वातावरणात माननीय मंत्रीमहोदयही तल्लीन झाले.
या भव्य व आकर्षक कटआऊटस (फलक) सोबत वारकरी बांधव सेल्फी घेऊन वारीचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत होते.