DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शुभमन गिलच्या एका कॉलवर…काय झालं?

भारतीय संघात या खेळाडूची एंट्री.

DD News Marathi by DD News Marathi
June 30, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
शुभमन गिलच्या एका कॉलवर…काय झालं?

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. ३० जून २०२५

भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत आहे. पण त्याचवेळी भारताच्या संघात एका मॅचविनर खेळाडूची एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलने एक फोन फिरवला आणि हा मॅचविनर खेळाडू थेट संघात दाखल झाला.

भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पहिल्या कसोटीत भारताचे ३-४ खेळाडूच चमकले, बाकीच्यांनी मात्र निराशा केली. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या संघात मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामध्येच आता शुभमन गिलने एका खास खेळाडूला फोन करून भारतीय संघात बोलावून घेतले आहे. या खेळाडूने संघाबरोबर चांगलाच सराव केला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत तो खेळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे.

भारतीय संघ दुसऱ्या कसोटीचा सराव करत होता, त्यावेळी एक नवीन खेळाडू सराव करताना दिसला. या खेळाडूचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर या खेळाडूल जेव्हा विचारलं की, तू भारतीय संघात कसा आलास, तेव्हा त्याने या गोष्टीचा खुलासा केला.

आयपीएलमधील पंजाब किंग्सचा क्रिकेटपटू हरप्रीत ब्रार यावेळी म्हणाला की, “माझी पत्नी स्विडनची नागरीक आहे. त्यामुळे मी तिच्या घरी आलो होतो. स्विडनहून बर्मिंगहम जवळच आहे, हा प्रवास फक्त दीड तासाचा आहे. शुभमन गिल माझ्याशी काल फोनवर बोलत होता. त्यावेळी त्याने मला सराव करण्यासाठी यायला सांगितलं. मी पण इथेच असल्यामुळे त्याचं ऐकलं आणि भारतीय संघाबरोबर सराव करण्यासाठी आलो.” शुभमन गिलने फोन करून हरप्रीत ब्रारला संघाच्या सरावामध्ये बोलवून घेतले. हरप्रीतने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे तो चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याच्या गोलंदाजीचा फायदा भारताच्या फलंदाजांना होऊ शकतो.

हरप्रीत ब्रार हा फक्त सराव करायला आला, पण तो कसोटी सामना खेळू शकणार नाही, हे स्पष्ट आहे. फक्त संघाच्या सरावात सहभागी होण्यासाठी तो आल्याचे पाहायला मिळाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #2ndTestMatch#Edgbaston#England#HarpreetBrar#London#shubhmangill
Previous Post

आता काय करायचं? छगन भुजबळांचे निधन झाल्याची खोटी बातमी व्हायरल!

Next Post

भाजपची ताकद नाशिकमध्ये वाढणार ! अपूर्व हिरे भाजपप्रवेश करणार!

Next Post
भाजपची ताकद नाशिकमध्ये वाढणार ! अपूर्व हिरे भाजपप्रवेश करणार!

भाजपची ताकद नाशिकमध्ये वाढणार ! अपूर्व हिरे भाजपप्रवेश करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.