मुंबई प्रतिनिधी :
दि. ०१ जुलै २०२५
शेफाली जरीवाला हिचा पती पराग त्यागी यानं तिच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलं हे पोलिसांना सांगतिलं आहे. त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती, त्याची तयारी तिनं केली होती. इतकंच नाही तर तिनं उपवासही पकडला होता, अशी माहितीही त्यानं पोलिसांना दिली आहे. शेफाली अनेकदा उपवास पकडायची, त्यामुळं तिला हे नवीन नव्हतं. त्या दिवशी शेफालीचा उपवास होता, तिनं फ्रिजमधले काही पदार्थ खाल्ले अन् नंतर तिचा रक्तदाब कमी झाला. त्यानंतर काही समजायच्या आत होत्याचं नव्हतं झालं. शेफालीची मैत्रीण पूजा घई हिनं देखील शेफालीचं निधन झालं, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, याबद्दल एका मुलाखतीत सांगितलंय, तर तिचे शेवटचे शब्द काय होते, हे देखील तिनं शेअर केलंय.
शेफाली जरीवाला तरुण दिसण्यासाठी खास औषधं घेत होती, गेल्या काही वर्षांपासून तिची यासाठी ट्रिटमेंट सुरु होती. याबद्दलही पूजानं सांगितलं. मृत्यू झाला त्या दिवशी देखील तिनं आयव्ही ड्रिपचे डोस घेतले होते. हे तिच्यासाठी नेहमीचंच होतं. पण त्या दिवशी नेमकं काय घडलं, हे माहिती नाही.
त्या दिवशी शेफालीनं परागला त्यांचा पेट डॉग सिम्बाला फिरायला घेऊन जा, असं सांगितलं होतं. पराग त्यांच्या खुत्र्याला घेऊन खाली गार्डन परिसरात गेला होता. त्यानंतर शेफालीनं फ्रिजमधले काही पदार्थ खाल्ले अन् तिला अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर घरात काम करणाऱ्या मदतनीसानं परागला शेफालीची तब्येत बिघडल्याचं फोन करून सांगितलं होतं. दीदीला बरं वाटत नाहीये, असं तो फोनवर बोलला होता. यानंतर शेफालीनं देखील परागला मला कसं तरी होतंय, तू वर येऊ शकतोस का माझी काळजी घ्यायला…असं म्हटलं होतं. यानंतर परागनं त्यांच्या मदतनीसाला खाली बोलवलं आणि सिम्बाला (पाळीव श्वान) त्याच्याकडं सोपवलं आणि तो घरी शेफालीकडे गेला.
पराग घरी पोहोचला तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यानं पाहिलं तर पल्स चालू होते. पण ती डोळे उघडत नव्हती. तिचं पूर्ण शरीर थंड पडलं होतं. यानंतर परागला काही तरी चुकीचं घडल्याचं जाणवलं. कसलाही विचार न करता परागनं तात्काळ हॉस्पिटल गाठलं. पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, असा खुलासाही पूजानं केला.