DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सत्यशोधक विवाह जनजागृती कार्य अखंड चालू राहिले तर नक्कीच समाज बदलेल: नामदार छगन भुजबळ

शिवराज्याभिषेकदिनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे उदघाटन हे सत्यशोधक पुनर्विवाह लावून संपन्न

DD News Marathi by DD News Marathi
June 6, 2021
in ताज्या बातम्या
1
सत्यशोधक विवाह जनजागृती कार्य अखंड चालू राहिले तर नक्कीच समाज बदलेल: नामदार छगन भुजबळ

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि. ०६ जुन २०२१

पुणे-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे शिवराज्याभिषेक दिनी सत्यशोधक पुनर्विवाह दीपाली मेहेर, विधवा कल्याण आणि रामचंद्र डोके, विधुर, मोशी यांचा बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे उद्घाटन करून शानदार पणे संपन्न झाला.

यावेळी सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सिने कलाकार निवृत्ती उर्फे आप्पा बोराटे यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची फोटो प्रेम भेट देण्यात आली. वधु वर यांचे शुभहस्ते प्रथम थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला तर युगपुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो ला पुष्पहार व सत्यशोधक केंद्राचे उदघाटन सिने कलाकार मा. निवृत्ती बोराटे यांचे हस्ते फित कापून हे केंद्र लोकार्पण करण्यात आले.

या सोहळ्यासाठी व वधु वर यांना आशिर्वाद देण्यासाठी राज्याचे अन्नपुरवठा नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री व नाशिक चे पालकमंत्री ना.छगन भुजबळ हे कोव्हिडं 19च्या व्यस्त कार्यामुळे येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी पाठविलेल्या शुभसंदेशा मध्ये म्हंटले की, “सर्व समाजाने अंधश्रद्धा, कर्मकांड व आर्थिक उधळपट्टी न करता समाजात महापुरुषांचे विचाराने सत्यशोधक विवाह करावेत .तसेच सत्यशोधक विवाह जनजागृतीचे कार्य जर अखंड पणे चालू राहिले तर समाज नक्कीच बदलेल.आणि हे काम फुले एज्युकेशन संस्था गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्र व महाराष्ट्राटाचे बाहेर जाऊन करीत आहे म्हणून सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे अभिनंदन केले.”

यावेळी सिनेकलाकार निवृत्ती बोराटे म्हणाले की, “फुले दाम्पत्याने केलेले कार्य अलौकिक असे असून त्याच्या विविध कार्याचा अभ्यास केला तर समाजपरिवर्तन हे लगेचच होते.पुढे ते असे म्हणाले की त्यांच्या कार्याचा एक धागा घेऊन आज हे केंद्र सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून मोफत विवाह लावत आहे हे देखील प्रेरणा समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे.”

सत्यशोधक चित्रपटाचे 80 टक्के काम पूर्ण करून लवकरच चित्रपट प्रदर्शित करणार असल्यामुळे त्यांचा व पत्रकार ज्ञानेश्वर जाधव, नम्रता कामत आणि मुंबई वरून खास आलेले पत्रकार कैलास डोके, सामाजिक कार्यकर्ते मोहन बटवाल, श्रीमती वनिता मेहेर यांचा सत्कार रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले गीत चरीत्र ,ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ग्रंथ व फुले दाम्पत्य फोटो प्रेम तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. तर सत्यशोधक निवृत्ती बोराटे यांनी ढोक परिवार व हनुमंत टिळेकर व सुदाम धाडगे यांना फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

हा सत्यशोधक विवाह रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावला तर महात्मा फुले रचित मंगळाष्टके व सत्याचा अखंड गाऊन सुदाम धाडगे, हनुमंत टिळेकर व रघुनाथ ढोक यांनी भारतीय संविधान उद्देशिका सर्वांकडून वदवून या सोहळ्याची शोभा वाढविली. यावेळी अक्षता म्हणून फुलांचा वापर करण्यात आला .या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य समता परिषदचे रवी सोनावणे , आकाश-क्षितिज ढोक ,भूषण मेहेर,प्रशांत डोके यांनी केले तर शेवटी सौ. आशा ढोक यांनी आभार मानले.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

शिवराज्य समुहाचे अध्यक्ष भुपेंद्र मोरे आयोजित न-हे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Next Post

सुवर्ण सिहांसन मंडळ आणि सन्मित्र फाउंडेशन यांचेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
सुवर्ण सिहांसन मंडळ आणि सन्मित्र फाउंडेशन यांचेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण सिहांसन मंडळ आणि सन्मित्र फाउंडेशन यांचेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

Comments 1

  1. Rajendra Dada so Hole says:
    4 years ago

    Proud

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.