DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

आपल्या कार्याच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी एक नावीन्यपूर्ण पाऊल.

DD News Marathi by DD News Marathi
July 2, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, मनोरंजन
0
मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

माळशिरस प्रतिनिधी :
दि. ०२ जुलै २०२५

आषाढ महिना म्हटलं की एकादशीचे वेध सर्वांना लागतात. आषाढी एकादशी हा विठू माऊलीच्या सार्‍या भक्तांचा आणि विशेषतः वारकर्‍यांचा अखंड आनंद सोहळा! त्याच एकादशीच्या पूर्वार्धात सारे वारकरी, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांबरोबर पंढरीच्या दिशेने मजल दरमजल करत मार्गस्थ होतात. त्यांना उन्हा पावसाची तमा नसते. पण ठिकठिकाणी विठ्ठलाची भक्तमंडळी त्यांची बडदास्त ठेवण्यास तत्पर असतात. त्यांच्या प्रबोधनासाठी, श्रमपरिहारासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम योजले जातात.

महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागानेही या वारकर्‍यांच्या प्रबोधनासाठी आणि आपले कार्य सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘भारुड’ या कलाप्रकाराचा अवलंब केला आहे. मंगळवार दि. ०१ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर, माळशिरस येथे या भारुडाने बहार आणत, उपस्थितांचे मनोरंजनात्मक मार्गाने प्रबोधन केले आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या कार्याची माहिती लोकांना दिली. वारकरी व उपस्थितांना विभागाच्या कार्याची माहिती होण्याबरोबरच त्यांचा श्रमपरिहारही झाला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bharud#MaharashtraGovernment#Malshiras#ReliefandRehabilitationDept
Previous Post

“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

Next Post

अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

Next Post
अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.