DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

उपायाला विरोध करणार्‍यास मृत्यूची भीती दाखवायचा.

DD News Marathi by DD News Marathi
July 2, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

पुणे प्रतिनिधी :
दि. ०२ जुलै २०२५

भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाउनलोड करून त्यांचे खासगी क्षण पाहणारा भोंदूबाबा भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळेही करायचा. भक्तांचे दोष आपल्या अंगावर घेत असून, त्यांच्या अडचणींवरील उपाय असल्याची बतावणी तो करायचा. एखाद्याने विरोध केल्यास भोंदूबाबा एका कागदावर तारीख लिहून त्या दिवशी भक्ताचा मृत्यू होईल, अशी भीती घालायचा, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार (वय २९, रा. सूस गाव, मुळशी) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याच्याविरोधात ३९ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी पाच भक्तांकडे चौकशी केली असता, आरोपी भोंदूबाबाच्या ‘हायटेक लीलां’चे किळसवाणे प्रकार उघडकीस आले.

या गुन्ह्यात आरोपी भोंदूबाबाच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीकडून तीन मोबाइल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्डसह अस्वस्थता आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट जप्त करण्यात आले आहेत. ‘आरोपीने भक्तांचे खासगी क्षण ‘हिडन ॲप’द्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती मिळाली असून, हा लॅपटॉप हस्तगत करायचा आहे. आरोपीने पुरुषांप्रमाणेच महिला व लहान मुलांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता असून, त्यांच्याकडून लाटलेल्या पैशातून मालमत्ता खरेदी केली आहे का, त्याने स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे का, यासह विविध मुद्द्यांवर तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी,’ अशी मागणी तपास अधिकारी उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली.

आरोपी बाबाने भक्ताला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठे संकट येणार असल्याची भीती दाखवून त्याच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला पाण्यातून गुंगीची गोळी देऊन अनैसर्गिक अत्याचार केले. दुसऱ्या भक्ताला गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करताना दोष स्वत:वर घेत असल्याची बतावणी केली.

आणखी एकाला त्याचे दोष दूर करण्यासाठी ‘हिडन ॲप’ सुरू ठेवून मैत्रिणीशी संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले. आरोपीच्या चाळ्यांना एका भक्ताने विरोध केला असता, ‘तू उपाय अर्धवट सोडून चालला आहे,’ असे सांगून एका कागदावर तारीख लिहून त्या तारखेला मृत्यू होईल, अशी भीती घातल्याचे भक्तांनी सांगितले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BhonduBaba#FraudBaba#PoliceRemandPune
Previous Post

मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

Next Post

मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

Next Post
मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची पहिली आढावा बैठक!

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची पहिली आढावा बैठक!

August 22, 2025
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शाळाबाह्य होण्याचा धोका!

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शाळाबाह्य होण्याचा धोका!

August 22, 2025
अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याआधीच गृहखरेदी!

अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याआधीच गृहखरेदी!

August 22, 2025
संसद सुरक्षा यंत्रणेला धक्का – तरुणाचा संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न!

संसद सुरक्षा यंत्रणेला धक्का – तरुणाचा संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न!

August 22, 2025
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पुण्यातील विद्यार्थी वसतिगृहाला अचानक भेट!

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पुण्यातील विद्यार्थी वसतिगृहाला अचानक भेट!

August 22, 2025
“शेतकऱ्यांनी हताश होऊ नये, सरकार त्यांच्या पाठिशी आहे” – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही!

“शेतकऱ्यांनी हताश होऊ नये, सरकार त्यांच्या पाठिशी आहे” – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही!

August 21, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.