DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील व्यवसाय!

पुण्यात पोलिसांची धडक कारवाई.

DD News Marathi by DD News Marathi
July 9, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील व्यवसाय!

पुणे प्रतिनिधी :
दि. ०९ जुलै २०२५

शहरातील उच्चभ्रू भागांमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या देह व्यापार रॅकेटवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या विमानतळ तसेच बाणेर परिसरात दोन स्वतंत्र ठिकाणी टाकलेल्या धाडीत पोलिसांनी एकूण १८ मुलींची सुटका केली आहे. यामध्ये १० हून अधिक परदेशी मुलींचा समावेश असल्याने, हे रॅकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बाणेर येथील एका लक्झरी स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली. येथे दोन तरुणींची सुटका करण्यात आली. तपासातून समोर आले आहे की, ग्राहकांकडून ‘थेरपी’च्या नावाखाली हजारो रुपये आकारून त्यांचा वापर देह व्यापारासाठी केला जात होता. या स्पा सेंटरच्या मालकासह व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत विमानतळ भागातील एका नामांकित स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला असता, तेथे बेकायदेशीररित्या देह व्यापार सुरू असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत 16 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. त्यापैकी 10 महिला परदेशी असून उर्वरित 6 भारतीय आहेत. या प्रकरणात स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागा भाड्याने देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित स्पा सेंटर मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसायासाठी वापरले जात होते.

या दोन्ही प्रकरणांमध्ये विमानतळ व बाणेर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित स्पा सेंटरच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. विशेषतः परदेशी महिलांना भारतात कशा प्रकारे आणले गेले, याबाबत चौकशी सुरू असून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलिसांची विशेष टीम कार्यरत आहे.

या प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी अशा स्पा सेंटरवर सातत्याने कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा संशयास्पद ठिकाणांबाबत पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #PoliceAction#Prostitution#PunePoloce#Spa
Previous Post

अफजल खान वाटतात उद्धव ठाकरे!

Next Post

समलिंगी व्हिडिओवरुन ब्लॅकमेल केला जात होता!

Next Post
समलिंगी व्हिडिओवरुन ब्लॅकमेल केला जात होता!

समलिंगी व्हिडिओवरुन ब्लॅकमेल केला जात होता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

January 29, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.