DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“तुम मच्छी मटन खानेवाले मराठी आदमी गंदे हो!”

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वादाचा नवा प्रकार!

DD News Marathi by DD News Marathi
July 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
“तुम मच्छी मटन खानेवाले मराठी आदमी गंदे हो!”

मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ जुलै २०२५

मराठी माणसावर अन्याय झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईतील घाटकोपर येथे एका मराठी कुटुंबाला अपानास्पद वागणूक देण्यात आली. घाटकोपरच्या एका रहिवासी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानीत करण्यात आले. मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी ही बाब उघडकीस आणली. आपल्या कार्यकर्त्यांसोबत सोसायटीत जाऊन त्यांनी संताप व्यक्त करत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना समज दिली आहे. या रहिवासी सोसायटीत फक्त चार मराठी कुटुंबं आणि इतर गुजराती, जैन तसेच मारवाडी कुटुंबे राहातात. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील पार्टेंनी शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथे आयोजित एका कार्यक्रमात घाटकोपर परिसराची भाषा ही मराठी नसून गुजराती असल्याचे म्हटले होते. जाणूनबुजून मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान करण्याच्या बऱ्याच घटना अलिकडच्या काळात दिसत असतानाच असाच एक प्रकार मुंबईचे उपनगर असलेल्या घाटकोपर परिसरात घडला. येथील एका गुजराती, जैन आणि मारवाडी बहुल रहिवासी सोसासटीत एका मराठी कुटुंबाला, ते मांसाहार करतात म्हणून अपमानास्पद वागणूक देण्यात आली.

या सोसायटीत राहणाऱ्या शाह नावाच्या एका व्यक्तीने संबंधित कुटुंबाला, ‘मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटन खाते हो’, असे म्हटले. या रहिवासी गेल्या काही दिवसांपासून मांसाहार करण्यावरुन अमराठी रहिवासी मराठी कुटुंबांना त्रास देत असल्याची बातमी मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांना समजताच ताबडतोब ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्या इमारतीत दाखल झाले. सोसायटीत शिरत शाह नावाच्या व्यक्तीने मराठी कुटुंबाच्या केलेल्या अपमानाचा जाब त्यांनी सोसायटीच्या गुजराती आणि जैन कुटुंबीयांना विचारला. तेव्हा शाह नावाची व्यक्ती समोर आली नाही. तर सोसायटीतील इतर रहिवाश्यांनी “आम्ही मराठी विरुद्ध अमराठी भेदभाव करत नाही. मराठी कुटुंबांच्या मांसाहार खाण्यावर आम्ही कोणतेही बंधन आणलेले नाही” अशी सारवासारव केली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ghatkopar#marathi#MNS#NonMarathi
Previous Post

समलिंगी व्हिडिओवरुन ब्लॅकमेल केला जात होता!

Next Post

लोकांच्या टोमण्यांना वैतागून मुलीची हत्त्या!

Next Post
लोकांच्या टोमण्यांना वैतागून मुलीची हत्त्या!

लोकांच्या टोमण्यांना वैतागून मुलीची हत्त्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

January 29, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.