पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि.०७ जुन २०२१
येरवडा, विमाननगर परिसरातील सुवर्ण सिहांसन मंडळ आणि सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनासारख्या महामारीत ऑक्सिजनचा सर्वांनाच तुटवडा भासला होता. तेंव्हा, परिसरातील नैसर्गिक ऑक्सिजन वाढणे हा या वृक्षारोपण कार्यक्रमाचा मुख्य़ उद्देश होता.
या वेळी प्रमुख पाहुणे बहुजन समाज पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष हुलगेश भाई चलवादी, लायन क्लब अध्यक्ष वडगाव शेरी राजीव अगरवाल, बसपा महाराष्ट्र सचिव सुदीप गायकवाड, अरूण भाऊ गायकवाड, इंगलेसाहेब,,लोंढे साहेब, ट्राफिक पोलिस प्रकाश भौगण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्ण सिहांसन मंडळाचे अध्यक्ष धनराज परदेशी, वृषभ झेंडे, रोहित कांबळे, नामदेव सोलंकी, संजय आठवले व किरण कवडगी यांनी मुख्य भूमिका बजावली.
याप्रसंगी हुलगेश चलवादी म्हणाले, “माणसांच्या जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे. सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये केवळ ऑक्सिजन नाही म्हणून कित्येक लोकांचे जीव गेले. तेंव्हा, हजारो, लाखो रुपये असून ही ऑक्सिजन मिळाला नाही. मात्र, हाच ऑक्सिजन निसर्गाने मुक्त आणि मुबलकपणे दिला आहे. मात्र, परंतू आपण मानव त्याची किंमत करीत नाही. म्हणून किमान प्रत्येकाने एक वृक्ष तरी लावायला आणि जगवायला हवे.”
आयोजक सन्मित्र फाऊंडेशन चे अध्यक्ष यांनी पर्यावरणाची माहिती दिली. प्रत्येक आठवड्यातून १०० झाडे लावण्यात येतील असे सांगून या सर्व झाडांचे शंभर टक्के निगा राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे जाहीर केले.