DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नाशिक मधील हनी ट्रॅप प्रकरण!

करुणा मुंडे महिलेला घेऊन आल्या कॅमेऱ्यासमोर. दोन एसीपींचे चे दाखवले फोटो.

DD News Marathi by DD News Marathi
July 22, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
नाशिक मधील हनी ट्रॅप प्रकरण!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २२ जुलै २०२५

मुंबई: राज्यात सध्या नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ठाण्यातील एका होमगार्ड असलेल्या महिलेने प्रसारमाध्यमांसमोर येत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. करुणा मुंडे यांनी या महिलेला समोर आणत हा कसलाही हनी ट्रॅप नसून सदर महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. “होमगार्ड असलेल्या महिलेवर दोन एसीपींनी लैंगिक अत्याचार केला. तिने तक्रार दाखल करू नये म्हणून पोलिसांनी तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला. तसंच तिच्या मुलींनाही त्रास देण्याचं काम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला न्याय मिळवण्यासाठी फिरत आहे, मात्र तिची कोणीही दखल घेतली नाही. कारण या प्रकरणातील आरोपी एसीपी असल्यामुळे कोणीही महिलेची मदत करायला तयार नाही,” असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पीडित महिलेने पत्रकार परिषदेत ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवत आरोप केला की, ” ठाण्यातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने जिम परिसरात माझ्याशी ओळख केली. मी तुम्हाला ओळखतो, असं सांगून त्याने माझा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तो मला सातत्याने मोबाईलवर चांगले-चांगले मेसेज करत होता. एक दिवस त्याने मला त्याच्या घरी चहा प्यायला बोलावलं. तसंच तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यावं, अशी माझ्या बायकोची इच्छा असल्याचं सांगितलं आणि फोनवर माझं एका महिलेशी बोलणं करून दिलं. त्याची बायको आपल्याशी फोनवर बोलली आहे, असं समजून मी त्याच्या घरी चहा प्यायला गेले. पण तिथं गेल्यावर त्याने मला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका पोलिसाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला,” असा आरोप पीडितेने केला आहे.

“मला शुद्ध आल्यानंतर मी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, पण तिथं माझी तक्रार घेतली नाही. त्यानंतर मी डीसीपी, सीपी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून माझ्यासोबत झालेला प्रकार सांगितला, पण कोणीही दखल घेत नाही. माझं राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगणं आहे की पुढील ८ दिवसांत जर तुम्ही या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी माझं आयुष्य संपवणार आहे,” असा इशाराही सदर महिलेने दिला आहे.

दरम्यान, “होमगार्ड असलेल्या महिलेवरच जर अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांच्या सुरक्षेचं काय? महाराष्ट्रात शासन प्रशासन कुठे आहे? महिलांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शासकीय अधिकारी आणि आजी-माजी मंत्री मन भरून हनीमून करत आहेत, मात्र मन भरल्यानंतर त्यांना तेच हनी ट्रॅप वाटत आहे,” असा हल्लाबोल करुणा मुंडे यांनी केला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #honeyTrap#KarunaMunde#LadyHomeguard#Nashik
Previous Post

खुनाचा आरोप असलेल्या उद्ध्या उर्फ उद्धव कांबळेला पोलिसांकडून अटक!

Next Post

मुख्यमंत्री कोकाटेंच्या ‘रमी’ प्रकरणाबद्दल म्हणाले…!

Next Post
मुख्यमंत्री कोकाटेंच्या ‘रमी’ प्रकरणाबद्दल म्हणाले…!

मुख्यमंत्री कोकाटेंच्या 'रमी' प्रकरणाबद्दल म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.