पुणे प्रतिनिधीः
सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेत देशात प्रचंड कोरोना रुग्ण सापडत आहेत. या कोरोनाच्या दुस-या लाटेत सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण कर्नाटकातील बंगळुरु जिल्ह्यात आहेत. त्यानंतर देशात सर्वाधिक दुस-या क्रमांकाचे अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.
सध्या बंगळुरु मध्ये एक लाख ४९ हजार ६२४ एवढे अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर, १ लाख १६ हजार इतके कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह आहेत. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये ही जवळपास १ लाखाच्या आसपास अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात ही ८० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
तेंव्हा, पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी म्हणून कोरोना नियमांचे पालन करुन विविध उपाययोजना केल्या पाहिजेत. आता, पुणेकर नागरिकांची जबाबदारी आणखी वाढली आहे.