DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

दिला जाणार लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीदिनी.

DD News Marathi by DD News Marathi
July 23, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

पुणे प्रतिनिधी :
दि. २३ जुलै २०२५

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना २०२५ चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने हा सन्मान प्रदान केला जाईल.

शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी १०:३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती घेतली. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल.

या सोहळ्यात टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे हेही उपस्थित राहाणार आहेत.

पुरस्काराचे स्वरूप

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे स्वरूप आहे. १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना प्रदान करण्यात आला होता. आजवर अनेक दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #LokamanyaTilak#LokamanyaTilakNationalAward#NitinGadkari#RohitTilak
Previous Post

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये तीन नवीन कलाकारांची एंट्री!

Next Post

कल्याण मारहाण प्रकरणाला नवे वळण!

Next Post
कल्याण मारहाण प्रकरणाला नवे वळण!

कल्याण मारहाण प्रकरणाला नवे वळण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.