पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि.०७ जुन २०२१
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात बोपोडी ब्लॅाक काँग्रेस कमिटी च्या वतीने पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात गायकवाड पेट्रोल पंप औंधगांव व प्रभाग क्रमांक ९ पाषाण बाणेर बालेवाडी माऊली पेट्रोल पंप या दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आणि रमेश बागवे,मोहन जोशी, दत्ता बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, शिवाजी बांगर, नंदलाल धिवार ,ब्लॅाक अध्यक्ष राजेंद्र भुतडा, युवक सरचिटणीस स्नेहल बांगर, महिला अध्यक्ष सुंदर ओव्हाळ, लता घडसिंग,अमिना शेख, मीना गायकवाड, गौरी काळे, मनोज दळवी, विजय जगताप, विशाल जाधव, मनोज भिंगारे, सुनील जाधवर,जीवन चाकणकर,रोहित धेंडे,संभाजी नेटके,मंगेश निम्हण,अक्षय चव्हाण, मनोज दळवी राहूल भोसले,तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या अंदोलनाचे आयोजन कोथरूड ब्लॉक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मा.दता जाधव इ. मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.