नागपूर प्रतिनिधी : अनिल पवार
दि. ३१ जुलै २०२५ :
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांच्या जन्म जयंतीनिमित्त काल सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, गोंड राजे विरेंद्र शहा, माजी महापौर मायाताई इवनाते, सिनेट मेंबर दिनेश शेराम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ अध्यक्ष सूर्यकांत उईके, राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष विनोद मसराम, माजी नगरसेविका सरस्वती सलाम, प्रिया ताई तोडसाम, डॉ. आशिष कोरेटी, अपर आयुक्त आयुषी सिंग, उपायुक्त डीगांबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर, विजय परतीके, विनोद उईके, स्वप्नील मसराम, प्रमोद उईके, श्याम कोडापे, राम कोडापे, रोहित वलके, श्याम कार्लेकर, ललित पवार यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
यावेळी गोंडी पारंपरिक वाद्य आणि नृत्य सादर करून सांस्कृतिक वारसा जोपासला गेला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गोंड राजे बक्त बुलंद शहा यांचे नागपूरच्या विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांनी १७०२ मध्ये देवगड, मध्य प्रदेश येथून आपली राजधानी नागपूरला हलवली आणि अनेक सुधारणा व बांधकामांद्वारे शहराला व्यापारी केंद्र बनवले. त्यांचा सांस्कृतिक वारसा आजही समाजाला प्रेरणा देतो.”
हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आणि गोंड राजे बक्त बुलंद शहा यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली.