मुंबई प्रतिनिधी :
दि. ३१ जुलै २०२५
मुंबई हायकोर्टाने, संपूर्ण देशाच्या नजरा खिळलेल्या २००८ मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सर्व सातही आरोपींची १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर निर्दोष सुटका केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी अशा सातही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता निकालाचे वाचन सुरु झाले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत निकाल जाहीर करण्यात
न्यलयाने हे पाच मुद्दे स्पष्ट केले –
– लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काश्मीरमधून आरडीएक्स आणले आणि घरी बॉम्ब तयार केला, याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत.
– साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे बॉम्ब स्फोट झालेल्या बाईकचा ताबा त्यावेळी होता, हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलं नाही.
– स्फोट झालेला बॉम्ब त्या बाईकमध्येच लावलेला होता, असं कोर्टात निर्विवादपणे सिद्ध होऊ शकलेलं नाही.
– बॉम्ब स्फोट घडवण्यासाठी बैठका झाल्या, हा मुद्दाही सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेला नाही.
– आरोपींच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत, संशयाच्या आधारावर त्यांना दोषी ठरवता येणार नाही.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात, २९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री ९.३५ वाजता मशिदीजवळ एलएमएल फ्रीडम मोटारसायकलमध्ये लावलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट झाला होता. सहा जणांना या घटनेत प्राण गमवावे लागले होते, तर १०१ जण जखमी झाले होते. हा स्फोट झाला त्या काळात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमझान महिना सुरु होता.
आरोपींचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यांवरील अर्ज, मुंबई हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टातील वेगवेगळी अपिलं, तपास संस्थांमध्ये झालेला बदल, खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या झालेल्या बदल्या, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे दीर्घकाळ ताणलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर १७ वर्षांनी जाहीर झाला.
“तेरा दिवस माझा अनन्वित छळ झाला. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, १७ वर्षं मी अपमानित झाले. मला स्वतःच्याच देशात दहशतवादी ठरवण्यात आलं. ज्यांनी मला हे दिवस दाखवले, त्यांच्याविषयी मी बोलू इच्छित नाही. फक्त एवढंच सांगावसं वाटतं, की मी संन्यासी आहे म्हणून जिवंत राहिले. मला ऐकून घेतल्याबद्दल, समजून घेतल्याबद्दल न्यायाधीशांचे आभार” असं या निकालावर बोलताना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.