DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

तणावपूर्ण शांतता. परिस्थिती नियंत्रणात.

DD News Marathi by DD News Marathi
August 2, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

दौंड प्रतिनिधी :
दि. ०२ ऑगस्ट २०२५

सध्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये शांततेचं वातावरण आहे. काल घडलेल्या घटनेमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. पोलिसांनी मात्र आता परिस्थिती आटोक्यात आणली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले आहे. यवतमधील सर्व दुकानं आणि व्यापार त्यामुळे बंद आहेत. नागरिकांनी घोळक्याने उभे राहू नये, काम नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस सगळीकडे करत आहेत. येथे शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पोलिसांनी रात्रीपासूनच, शुक्रवारी दंगल घडवणाऱ्या आरोपींची धरपकड सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र यवत येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या झालेल्या सभेत अनेकांची चिथावणीखोर भाषणं झाली.

मध्यप्रदेश इथे एका ६० वर्षांच्या महाराजाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असं शुक्रवारी सकाळी एका तरुणाने एका चॅनेलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं. हे निमित्त साधून ही संपूर्ण दंगल झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत २० जणांना अटक केली असून अजूनही अनेक जणांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पुण्यातील यवतमध्ये चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.

यादरम्यान शुक्रवारी यवतमध्ये काल गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्‌गुरु स्वामी हेमांगी सखीजी यांची भाषणं झाली. त्यानंतर फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून पुन्हा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर शुक्रवारी थेट सकाळी बाजारपेठ बंद करण्यात आली. काही घरांवर, बेकरी आणि धर्मस्थळांवर जमावाने हल्ला केला. यात काही दुकानं आणि घरांना आगी लावण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #chhatrapatishivajimaharaj#Dhond#YavatUnrest
Previous Post

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

Next Post

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

Next Post
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.