DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

पन्नास लाखांची फसवणूक करणारी 'लुटेरी दुल्हन' अखेर अटकेत

DD News Marathi by DD News Marathi
August 2, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

नागपूर प्रतिनिधी :
दि. ०२ ऑगस्ट २०२५

समाजात ‘लुटेरी दुल्हन’ म्हणून कुप्रसिद्ध झालेली आणि दीड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारी समीरा फातिमा अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. गिट्टीखदान पोलिसांच्या विशेष पथकाने, सिव्हिल लाईन्स परिसरात डॉलीच्या टपरीवर चहा घेत असताना तिला अटक केली.

मार्च २०२३ मध्ये पहिली तक्रार, समीरा फातिमा हिच्याविरोधात दाखल झाली होती. फेसबुकद्वारे, गुलाम गौस पठाण या ट्रॅव्हल व्यावसायिकाची तिच्याशी ओळख झाली होती. घटस्फोटित असल्याचं महिलेने व्यावसायिकाला सांगितलं. त्यानंतर व्यावसायिकाने समीराशी लग्न केलं. पण लग्नानंतर सतत भांडण, खोटे आरोप आणि धमक्यांमधून ती पैसे उकळत राहिली. लाखो रुपये उकळल्यानंतर, तिने त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला. ती सेटलमेंटच्या नावाखाली त्यातही मोठी रक्कम मागत होती.

विशेष म्हणजे समीरा स्वतःला शिक्षिका असल्याचं सांगत होती आणि समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रिय होती. ती विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. “माझा घटस्फोट झालाय, मला तुमचा आधार हवा आहे,” अशा भावनिक क्लृप्त्यांनी ती पुरुषांची सहानुभूती मिळवायची. एकदा समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसला की ती त्यांच्याशी निकाह करून काही आठवड्यांतच भांडण उकरुन काढायची आणि नंतर खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन पैसे मागायची.

सध्याच्या तपासानुसार, समीराने आतापर्यंत किमान आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केली असून त्यांच्याकडून एकूण ५० लाख रुपयांची आर्थिक लूट केल्याचं स्पष्ट झालं आहे. ती प्रत्येकवेळी ठिकाणं बदलत होती, पोलीस तपास चुकवत होती आणि कोर्टातील खटल्यांचा गैरफायदा घेत होती. तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे खटल्यांच्या माध्यमातून मोठ्या रकमा वसूल करून सेटलमेंट करणं होतं.

पोलिसांनी या लुटेरी दुल्हनला सरतेशेवटी अटक केली असून न्यायालयाने तिला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून आणखी फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. गिट्टीखदान पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Fraudster#GittiKhadan#LuteriDulhan#Nagpur#Police#SameeraFatima
Previous Post

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

Next Post

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

Next Post
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.