DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

राज्यातील विविध प्रलंबित व प्रस्तावित प्रश्नांवर पंतप्रधानाशी तब्बल दीड तास चर्चा

DD News Marathi by DD News Marathi
June 8, 2021
in राजकीय
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि.०८ जुन २०२१

आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते.

या भेटीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे

राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी मा पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित  चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते  सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो.

कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधान आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल

ज्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदने दिली तसेच चर्चा झाली ते असे आहेत:

      एसईबीसी मराठा आरक्षण

      इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण

      मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण

      मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे

      राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई

      पिक विमा योजना : बीड मॉडेल

      बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी

      नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे

      १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक)

      १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था )

      मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे

      राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत

 

तेंव्हा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडलेले प्रश्न भविष्यात सुटतात की त्याला केराची टोपली दाखविली जाते, हे येणार काळच ठरवेल.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांना एकत्र घेऊन आंदोलने करणार : छगन भुजबळ

Next Post

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून होणार सुरु

Next Post
आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून होणार सुरु

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून होणार सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.