सातारा प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०८ जुन २०२१
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील जलसिंचनाच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी मतदारसंघातील जलसिंचनाचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत वाई तालुक्यातील कवठे – केंजळ उपसा जलसिंचन योजना, नागेवाडी मध्यम पाटबंधारेची उर्वरित कामे व जांभळी खोऱ्यातील गावांसाठी उपसा जलसिंचन प्रकल्प तसेच खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम – बलकवडी कालव्याच्या वरील बाजूच्या ११ गावांना कालव्यातून उपसा पद्धतीने पाणी मिळणेबाबत आणि नीरा – देवघर प्रकल्प अंतर्गत वाघोशी, शेखमिरवाडी व गावडेवाडी या उपसा जलसिंचन योजना अशा विविध योजनांच्या निविदा काढणेबाबत चर्चा झाली. यावेळी वाघोशीच्या पुढे नीरा- देवघरच्या कालव्यांचे काम पूर्ण करणेसाठी निधींची भरीव तरतूद करणेबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.
याप्रसंगी जलसंपदा विभागाचे सचिव बी. के गौतम साहेब, श्री. कुहिरकर साहेब, कार्यकारी संचालक श्री. गुणाले साहेब, श्री. पी. एन. मुंडे साहेब, पुणे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, सातारा प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, नीरा – देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. डुबल व अन्य अधिकारी उपस्थित होते.
बातमी नक्की शेअर करा