DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ही तर निवडणूक आयोगाची मग्रुरी – संजय राऊत!

निवडणूक आयोगावर संजय राऊत भडकले.

DD News Marathi by DD News Marathi
August 19, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
ही तर निवडणूक आयोगाची मग्रुरी – संजय राऊत!

नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १९ ऑगस्ट २०२५

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांबाबत केलेल्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका आता वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे.

संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत निवडणूक आयुक्तांवर टीका करत, “राहुल गांधींनी शपथपत्र द्यावं किंवा देशाची माफी मागावी, ही मागणी म्हणजे सरळ मग्रुरी आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून हा अहंकार अपेक्षित नाही. तुम्ही शपथपत्र कोणाकडे मागताय? राहुल गांधींकडे? असं असेल तर या देशाची ८० कोटी जनता शपथपत्र द्यायला तयार आहे,” असे घणाघाती वक्तव्य केलं.

ते पुढे म्हणाले, “भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी देखील मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला होता. मग निवडणूक आयुक्तांनी त्यांच्याकडे शपथपत्र मागण्याची हिंमत दाखवली का? फक्त राहुल गांधींना लक्ष्य करणं हा पक्षपातीपणाच आहे.”

राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट भाजपाच्या हिताचे रक्षण केल्याचा आरोप करत, राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्याला आयुक्तांनी ठोस उत्तर दिलेले नाही, असंही म्हटलं.

निवडणूक आयुक्तांचं काय म्हणणं होतं?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, बिहारमध्ये मतदारयाद्यांची विशेष पडताळणी (एसआयआर) सुरू आहे आणि त्याबाबत काही राजकीय पक्ष अपप्रचार करत आहेत. “मतचोरी आणि दुबार मतदानाचे आरोप निराधार आहेत. अशा निराधार आरोपांपाना निवडणूक आयोग घाबरत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

तसंच, वगळलेल्या मतदारांची नावे जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकाशित करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: @MatChori#DnyaneshKumar#ElectionCommission#RahulGandhi#SanjayRaut
Previous Post

ऋता–ललितच्या ‘आरपार’चा टीझर ‘सैयारा’ पेक्षा हिट?

Next Post

हळदगाव-परसोडी परिसरातील क्रशर प्लांटच्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात!

Next Post
हळदगाव-परसोडी परिसरातील क्रशर प्लांटच्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात!

हळदगाव-परसोडी परिसरातील क्रशर प्लांटच्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात ऑपरेशन लोटस नव्हे, “ऑपरेशन टायगर”ची तयारी?

सोलापुरात ऑपरेशन लोटस नव्हे, “ऑपरेशन टायगर”ची तयारी?

August 19, 2025
ChatGPT Go फक्त ₹399 मध्ये! भारतासाठी खास ऑफर!

ChatGPT Go फक्त ₹399 मध्ये! भारतासाठी खास ऑफर!

August 19, 2025
“ते काही पाप धुण्याचं मशीन नाही!” – प्रेमानंद महाराजांवर खेसारी लाल यादव यांची टीका.

“ते काही पाप धुण्याचं मशीन नाही!” – प्रेमानंद महाराजांवर खेसारी लाल यादव यांची टीका.

August 19, 2025
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक रंगतदार! ‘इंडिया’ आघाडीचं धक्कातंत्र?

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक रंगतदार! ‘इंडिया’ आघाडीचं धक्कातंत्र?

August 19, 2025
पावसाचा सर्वत्र धुमाकूळ.कोल्हापूरमधील रस्ते बंद!

पावसाचा सर्वत्र धुमाकूळ.कोल्हापूरमधील रस्ते बंद!

August 19, 2025
हळदगाव-परसोडी परिसरातील क्रशर प्लांटच्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात!

हळदगाव-परसोडी परिसरातील क्रशर प्लांटच्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात!

August 19, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.