वाशिम प्रतिनिधी :
दि. २० ऑगस्ट २०२५
राज्यात १९ जिल्ह्यातील १८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कृषी मंत्री या नात्याने दत्तात्रय भरणे हे सातत्याने राज्यातील नुकसानग्रस्त भागाची व शेतकरी बांधवांची माहिती घेत आहेत.
आज सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या नांदेड व वाशिम जिल्ह्यांच्या पाहणी दौ-यावर ते असून शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. गावागावांत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यासोबतच त्यांनी पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रत्येक लाभ वेळेत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांची काळजी हीच खरी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले!