पुणे प्रतिनिधी :
दि. २२ ऑगस्ट २०२५
कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय मामा भरणे यांनी शिवाजीनगर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला काल अचानक भेट देऊन पाहणी केली.
या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जेवणाविषयक समस्या, वसतिगृहातील स्वच्छतेचा अभाव तसेच इतर सोयी-सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर कृषी मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्याचे आदेश दिले.
विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी शासन पातळीवर प्रयत्नशील राहाण्याचा निर्धार कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.