मुंबई प्रतिनिधीः
भारतीय क्रिकेटपटू, मास्टर-ब्लास्टर व भारतरत्न सचिन तेंडूलकरवर वाढदिवसानिमित्त सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. जागतिक क्रिकेट मध्ये अनेक विक्रम रचलेल्या सचिन तेंडूलकर यास क्रिकेटचा देव म्हणून क्रिकेट प्रेमी पाहतात.
आज, सचिन तेंडूलकर यास फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मिडिया साईट्सवर मोठ्या प्रमाणावर चाहत्यानी शुभेच्छांचा वर्षाव केलेला दिसत आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत म्हणून सचिनला ओळखले जाते. सचिन तेंडूलकर यांचे आज जगभर करोडो चाहते आहेत.
बातमी नक्की शेअर करा