पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि.०९ जुन २०२१
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी दिलेला सर्वसमावेशक विकास, सर्वांगीण प्रगती व लोकसेवा हा त्रिसूत्री संदेश मनात ठेऊन प्रभागातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लसीकरण केंद्र सुरु केले आहे. हे केंद्र वानवडी प्रभागात श्रीमंत महादजी शिंदे शाळा, वानवडी गाव येथे नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
या लसीकरण केंद्राचा शुभारंभ बुधवारी खासदार वंदना चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेवक अशोक कांबळे, नगरसेविका रत्नप्रभा जगताप ,शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिलीप जांभूळकर, प्रफुल जांभुळकर, डॉक्टर दिनेश भेंडे, डॉक्टर मनीषा सुलाखे, डॉक्टर प्रीतम गावडे, सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे, प्रभाग अधिकारी कुंजन जाधव, सुनील राठोड, स्वीकृत नगरसेवक अमोल बाचल, धनश्री बोराडे, ओमकार जगताप, शिवसेना विभाग प्रमुख राजू अडागळे ,मुनीर सय्यद, महेश हांडे व मान्यवर उपस्थित होते.