पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०९ जुन २०२१
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक ४० मधील नगरसेविका व सहकारनगर-धनकवडी प्रभाग समितीच्या अध्यक्षा स्मिता कोंढरे व सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे यांनी आज प्रभागातील विविध विकासकामांसंदर्भात मुंबई येथे मंत्री महोदय व पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटीत त्यांनी प्रभागातील प्रश्नांविषयी निवेदने देऊन चर्चा केली.
आज सकाळी कोंढरे दाम्पत्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन आंबेगाव खु.जांभूळवाडी तलावाच्या विविध समस्यांविषयी चर्चा केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोंढरे दाम्पत्यांनी केलेल्या पाठपुराव्यामूळे जांभुळवाडी तलावाच्या बाबतीत रखडलेले प्रश्न लवकरच मार्गी लागू शकतात.
तसेच, प्रभाग क्रमांक 40 हा विधानसभेच्या खडकवासला व लोकसभेच्या बारामती मतदारसंघात येतो. त्यामूळे प्रभाग क्रमांक ४० मधील विविध समस्यांच्या पाठपुराव्याबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यांनंतर सुप्रिया सुळे यांनी ही संबधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर समस्या सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.