जळगाव प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०९ जुन २०२१
केंद्र शासनाच्या विचाराधीन असलेल्या फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन चर्चा करून जळगाव विमानतळाचा समावेश करण्याची विनंती केली होती. आजवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले होते. नुकतेच दिल्ली येथील स्कायनेक्स एरीओ कंपनीस जळगाव येथे फ्लाईंग अकॅडमी सुरू करण्याचे काम सोपविण्यात आले असून सप्टेंबरपासून प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने राज्यातील एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्र लवकरच कार्यान्वित होणार आहे. आता येथून जेट सर्व्ह या कंपनीने हेलिकॉप्टर प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली असून येथुन हेलिकॉप्टर प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याने जळगाव विमानतळ हे राज्यात वैमानिक प्रशिक्षण हब ओळखले जाईल. अशी माहीती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.
आज नवी दिल्ली येथे खासदार उन्मेश पाटील यांनी एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन तथा जळगावचे माजी जिल्हाधिकारी संजीवकुमार यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या नंतर त्यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.
हेलिकॉफ्टर प्रशिक्षण दिले जाणार
जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सूतोवाच एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन तथा जळगावचे माजी जिल्हाधिकारी संजीवकुमार यांनी यावेळी दिले. याप्रसंगी मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिह पुरी यांचे सह केंद्र सरकारचे तसेच एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे आभार मानले. तसेच प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्हयाच्या लौकिकात भर पडणार असून राज्यात जळगाव विमानतळ वैमानिकांचे हब म्हणून ओळखले जाणार आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की नवी दिल्ली एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन तथा जळगावचे माजी जिल्हाधिकारी संजीवकुमार यांची भेट घेतली. यावेळी दिल्ली येथील स्कायनेक्स ऐरीओ प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या संदर्भात ही खासदार उन्मेष पाटील यांनी चर्चा केली.