पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ११ जुन २०२१
पुणे शहरातील सेव्हन लव्हज चौकात बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाचे उदघाटन आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डायस प्लॉट ते वखार महामंडळापर्यंत बांधलेल्या या उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे व या उड्डाणपुलामुळे मार्केट यार्ड ते पुणे स्टेशन तसेच हडपसरकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे.
प्रभाग क्रं २८ मध्ये नव्याने विकसित झालेला सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलाचे लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम संपन्न झाला.पुणे शहराच्या विकासात भर घालणाऱ्या या उड्डाणपूलाचे काम भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले,कविता वैरागे, राजश्री शिळीमकर व प्रविण चोरबोले यांच्या पाठपुराव्यातून पूर्ण करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनिल कांबळे, भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, राजश्री शिळीमकर, कविता वैरागे, प्रविण चोरबोले व राजेंद्र शिळीमकर, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र सरदेशपांडे,आयुष चोरबेले उपाध्यक्ष युवा मोर्चा पर्वती मतदार संघ व कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.