पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ११ जुन २०२१
भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे विधानसभ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.१० शुभेच्छा मंगल कार्यालय, डावी भुसारी कॅालनी येथे नगरसेविका अल्पना गणेश वरपे आणि प्रदेश युवामोर्चा चिटणीस अॅड.गणेश जयवंत वरपे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत पाटील यांनी सुरु केलेल्या मोफत लसीकरण व रिक्षा चालक यांना मोफत CNG गॅस कूपन या उपक्रमाकरिता खारीचा वाटा म्हणून वरपे दाम्पत्यांनी पाटील यांच्याकडे धनादेश सूपूर्त केला. या प्रसंगी आमदार भीमराव तापकीर यांनी चंद्रकांत पाटील यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण शहरभर अतिशय सुंदर आणि छान कार्यक्रमांचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले होते. समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तींसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजपयोगी होता..
या प्रसंगी सावली संस्थेतील बहूविकलांग मुलांना फळे,अन्नधान्य,आरोग्य किट व खाऊ वाटप, प्रभागातील हॅास्पीटल व क्लिनीकला डिजिटल वेटमशीन भेट, नागरिकांना आरोग्यमंत्र किट वाटप शुभारंभ,रिक्षाचालकांना अन्नधान्य किट वाटप व नवीन घरेलू कामगार नोंदणी मोहिम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहूणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोथरूडचे संघचालक बाप्पू जगताप, संभाजीनगर भागाचे कार्यवाह सुधीर जवळेकर, परमहंस नगर भागाचे कार्यवाह अमोद कालगावकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडेपाटील, नगरसेविका डॅा.श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक सुशिल मेंगडे, नगरसेवक दिपक पोटे, शहर प्रवक्ते संदिप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, खडकवासला मंडल अध्यक्ष सचिन मोरे, स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, विलास मोहोळ, बाळासाहेब टेमकर, वृक्ष समिती सदस्य सचिन पवार, कोथरूड युवा मोर्चा मंडल अध्यक्ष दुष्यंत मोहोळ,राजेश कुलकर्णी, कोथरूड महिला अध्यक्षा हर्षदा फरांदे, कांचन कुंबरे,सागर कडू, कैलास मोहोळ, राजाभाऊ जोरी, पल्लवी गाडगीळ,सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर, शिरढोणकर, ज्वाला पवार, गायत्री सणस,अमरजा पटवर्धन, अक्षय ढाकणे, गणेश कोकाटे, राजेश मनगिरे, भरत मराठे, सूरेंद्र कंधारे, गणेश लोखंडे, कृष्णा भंडारी, राहुल जाधव, शंतनु नारके, प्रदिप जोरी, शैलेश गायकवाड, समीर जोरी, किरण वरपे, तुषार धामंदे, सिद्धेश कवडे, अभिजीत धुमाळ, शुभम शेवाळे, प्रणव उभे, संतोष महाजन, अभिजित गाडे, रूपेश भोसले, अजित शिगवण, अभिजीत ठाकूर, आशय रथकंठीवार, गणेश जोशी, राजीव निगडीकर, चैतन्य कुलकर्णी, अमोल शिर्के, हर्षद ओझा, बालींद्र बोरकर, ओंकार शिंदे आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार अमित सातपुते,अॅड.स्वप्निल अवधूत, अॅड उमेश दिवाणे, ललित सावंत, मंगेश मोहिते, शिवराज शिंदे, मयूर गादिया, अरूण डोंगरे, रूद्र क्षिरसागर, विनायक वरपे, रविंद्र बोरकर, तसेच डॅा.राजकुमार अंबड, डॅा.गिरीश वायचळकर, उदयसिंह जाधव, संजय वरपे, सचिन धनकुडे, सुधीर परळीकर, सावली संस्थेतील शिक्षिका व रिक्षाचालक बंधू व नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले व आभार सागर कडू यांनी मानले.