DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीत गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा!

मंत्री भरणेंनी गावकर्‍यांसोबत संवाद साधत दिला आठवणीना उजाळा.

DD News Marathi by DD News Marathi
September 22, 2025
in महाराष्ट्र
0
स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीत गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा!

पुणे प्रतिनिधी :
दि.२२ सप्टेंबर २०२५ :

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः शेतकरी म्हणून आपली ओळख जपत इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या त्यांच्या गावी शेतकऱ्यांसोबत बैलपोळा उत्सव साजरा केला. ग्रामीण भागातील श्रमसंस्कृती, मातीशी असलेली नाळ आणि बैलांवरील प्रेमाचे दर्शन घडवणारा पारंपरिक बैलपोळा उत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडींची पारंपरिक सजावट केली. रंगीबेरंगी कापड, फुलांचे हार, गोंडे, घुंगरं आणि फेट्यांनी सजवलेल्या बैलजोड्या गावभर मिरवणुकीत निघाल्या. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या तालावर आणि पारंपरिक वेशभूषेत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या वेळी गावकऱ्यांशी संवाद साधत बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकऱ्यांच्या श्रमांचा आणि बैलांवरील प्रेमाचा उत्सव असल्याचे सांगितले.

“मी स्वतः शेतकरी असल्याचा अभिमान बाळगतो. शेती क्षेत्रात कितीही तंत्रज्ञान आलं तरी बैलांशिवाय शेती अपुरी आहे. त्यांचे श्रम आपण मान्य केले पाहिजेत. बैलपोळा हा शेतकऱ्याच्या जीवनातील कृतज्ञतेचा दिवस आहे. आज भरणेवाडीच्या शेतकरी ग्रामस्थांसोबत दरवर्षीप्रमाणे बैलपोळा साजरा करताना मला अतिशय आनंद झाला. मी राजकारणात येण्यापूर्वीपासून गावात बैलपोळा उत्सवात सहभागी होत आहे. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी या सणासोबत जोडल्या गेल्या आहेत. बैलांना सजवून, पूजा करून त्यांची गावभर आदरपूर्वक मिरवणूक काढण्यात एक वेगळीच मजा आहे. घरात बैल असणं म्हणजे साक्षात शिवशंकर असण्यासारखं आहे. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला कृषी मंत्री करण्यात या माझ्या बैलांचं मोठं योगदान आहे असं मी मानतो,” असे भरणे म्हणाले.

भरणेवाडीतील ग्रामस्थांनी कृषी मंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. तसेच महिलांनी बैलांच्या आरत्या करून मंगलगीत गायले, तर युवकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, युवक मंडळ तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

“पाकिस्तानचं डिवचणं सहन झालं नाही, मग मीही उत्तर दिलं!” – अभिषेक शर्मा

Next Post

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे!

Next Post
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे!

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.