पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. १३ जुन २०२१
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेमध्ये भारतात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते. इतर देशांच्या तुलनेत भारतास दुस-या कोरोना लाटेचा सर्वाधिक फटका बसला. विशेष म्हणजे, ऑक्सिजन अभावी अनेकांचा मुत्यू झाला. म्हणून प्राचार्य डॉ.राजेंद्र खेडेकर यांच्या संकल्पनेतून श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून तब्बल 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची सोय केलेली आहे.
यासोबत, कोरोना महामारी आणि लॅाकडाऊन मध्ये प्राचार्य डॉ.राजेंद्र खेडेकर व श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टने मोठे काम केलं आहे. तब्बल 45 दिवस दररोज 1500 नागरिकांसाठी मोफत जेवण, 20 वैद्यकीय शिबिरे,19 रक्तदान शिबिरे तसेच मोफत रुग्ण वाहिनी सेवा यासोबतच पल्स सुपर स्पेशलिटी आयुर्वेदिक क्लिनिक ची हजारो पाकिटांचे मोफत वितरण व मोफत मार्गदर्शन इत्यादी उपक्रम राबवून समाजास हातभार लावला आहे. याशिवाय पुढील काळात ही प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्या संकल्पनेतून श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन दूत म्हणून काम करणार आहे. यासाठी संस्थेने तब्बल 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची सोय केली आहे. विशेषतः ही सेवा अनाथाश्रम, वृद्धाश्रम, सेवाभावी संस्था तसेच गरीब वस्तीतील नागरिक आणि कुपोषित उपेक्षित यांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर सदर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट परत घेऊन दुसऱ्या गरजू रुग्णाला देण्यात येणार आहे.
सदर उपक्रमासाठी मुकुल माधव फाउंडेशन यांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे. अध्यक्ष रितू छाब्रिया व सचिन कुलकर्णी यांनी सदर उपक्रमाला शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमाचा लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या विषयी बोलताना डॉ.खेडेकर म्हणाले, शक्यतो कृत्रिम ऑक्सिजन घेण्याची वेळ कोणावर येऊ नये. मात्र, कोरोना आजारामुळे आर्थिक कंबरडे मोडलेला रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट ही खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणार आहे. आम्ही आणखी दोन पाऊले पुढे टाकून समाजहितासाठी सदैव कार्यररत राहू. काळजी घ्या, मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, लक्षात ठेवा लढाई कोरोना आजाराविरोधात आहे, रुग्ण विरोधात नक्कीच नाही. त्यामुळे माणुसकी सोडू नका.
मोफत ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर एका फोनवर मिळवू शकता
सध्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महिना 15 ते 20 हजार रुपये इतके भाडे आकारले जात असल्यामूळे जे नागरिक भाड्याने कॉन्सन्ट्रेटर घेऊ शकत नाहीत, तसेच ज्यांना डॉक्टरांनी घरी ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर वापरण्यास सांगितलेले आहे अशा नागरिकांनी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांना मेसेज करावा. संपर्क क्रमांक- प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर -98228 70120