इंदापूर प्रतिनिधी :
दि. ०३ ऑक्टोबर २०२५
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा २०२५ उपक्रमाचा समारोप इंदापूर नगरपरिषदेमार्फत महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला. या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी यांनी आपल्या एका दिवसाच्या वेतनाचा १४३४१२ रुपयांचा धनादेश मा दत्तात्रय भरणे सो. कृषिमंत्री यांना पूरग्रस्त शेतकरी यांच्या मदतीसाठी देण्यात आला.
दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला होता. या अंतर्गत शहरात स्वच्छता मोहिमा, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी, आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ व पाककला स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व बक्षिसे प्रदान करण्यात आली. दिव्यांग महिला रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार झाला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत बचत गटांना प्रत्येकी ₹४ लाख बीज भांडवल प्रदान करण्यात आले. एकूण १७६ लाभार्थ्यांना ₹८.६२ लाखांचे अनुदान वितरण करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र सीएसआर फंडातून मिळालेल्या ७ ई-बाईकचे लोकार्पण मा. मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.