DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मराठी चित्रपटाच्या ‘मना’चे श्लोक या शीर्षकाला विरोध!

निर्मात्यांना आंदोलनाचा इशारा.

DD News Marathi by DD News Marathi
October 7, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
मराठी चित्रपटाच्या ‘मना’चे श्लोक या शीर्षकाला विरोध!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ ऑक्टोबर २०२५

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या आगामी मराठी चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला आहे. ‘मना’चे श्लोक या चित्रपटाच्या नावावर श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, नाव न बदलल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सेवा मंडळाचं म्हणणं आहे की, “‘मना’चे श्लोक” हे शीर्षक समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथाशी संबंधित असल्याने, त्याचा वापर एका काल्पनिक व मनोरंजनात्मक चित्रपटासाठी करणे हे धार्मिक भावना दुखावणारे आहे. त्यांच्या मते, पवित्र ग्रंथांशी निगडित शब्दांचा वापर सांस्कृतिक संवेदनशीलता लक्षात घेऊनच केला पाहिजे.

चित्रपटाच्या टीमकडून अद्याप या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सेवा मंडळाने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर लवकरच चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं नाही, तर संघटनेच्या वतीने आंदोलन छेडलं जाईल.

दरम्यान, ‘मना’चे श्लोक हा सिनेमा कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असून, त्यात मृण्मयी देशपांडेसोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, “ही कथा मनवा आणि श्लोक या दोन पात्रांभोवती फिरते. त्यांचं नातं, विचार आणि संवाद हे प्रेक्षकांना आपलेसे वाटतील. ही गोष्ट प्रत्येकाच्या मनातल्या विचारांशी नातं सांगणारी आहे.”

चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्यानंतरच या शीर्षकावर वाद उफाळून आला आहे. आता निर्माते आणि कलाकार या वादाला कशी प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ManacheShlok#MrunmayiDeshpande#Sajjangad#SamarthaRamadasSwami
Previous Post

मराठा समाजाला कोर्टाकडून दिलासा!

Next Post

ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडल्या मृत मुंग्या आणि चिखल!

Next Post
ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडल्या मृत मुंग्या आणि चिखल!

ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडल्या मृत मुंग्या आणि चिखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६, ७ आणि ८ डिसेंबरला अतिमुसळधार पाऊस!

६, ७ आणि ८ डिसेंबरला अतिमुसळधार पाऊस!

December 6, 2025
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीबाबत शरद पवार काय म्हणाले?

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीबाबत शरद पवार काय म्हणाले?

December 6, 2025
फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची निर्णायक बैठक!

फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची निर्णायक बैठक!

December 6, 2025
नाशिक वृक्षतोड प्रकरणावर काँग्रेसचा तिखट हल्ला!

नाशिक वृक्षतोड प्रकरणावर काँग्रेसचा तिखट हल्ला!

December 6, 2025
महत्त्वाची बातमी! वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरूवात!

महत्त्वाची बातमी! वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरूवात!

December 5, 2025
मैत्री दाखवत असताना मोदी-पुतिन यांची ‘सीक्रेट स्ट्रॅटेजी’?

मैत्री दाखवत असताना मोदी-पुतिन यांची ‘सीक्रेट स्ट्रॅटेजी’?

December 5, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.