DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मागण्या शासनस्तरावर स्वीकारणार – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे.

म्हणाले, "मी स्वत: द्राक्ष बागायतदार आहे. द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांची जाण आहे."

DD News Marathi by DD News Marathi
October 10, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मागण्या शासनस्तरावर स्वीकारणार – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे.

सोलापूर प्रतिनिधी :
दि. १० ऑक्टोबर २०२५

सध्या शेतकऱ्यांना बहुतांश अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी स्वत: द्राक्ष बागायतदार असून मला द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांची जाण आहे. आजच्या चर्चासत्रात द्राक्ष बागायतदार संघटनांकडून करण्यात आलेल्या सर्व मागण्या शासनस्तरावर स्वीकारणार असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित द्राक्षावरील फळ छाटणी चर्चासत्राचे उद्घाटन दीपप्रज्वलन करुन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, उपाध्यक्ष मारुतराव चव्हाण, संघटनेचे खजिनदार शिवाजी पवार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी रामचंद्र माळी, जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार इत्यादी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री. भरणे म्हणाले, मी स्वत: द्राक्ष बागायतदार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदाराच्या अडीअडचणी मला माहित आहेत. अतिवृष्टीने झालेले बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसानीसाठी पॅकेज क्रॉप कव्हर अनुदान यासह या चर्चासत्रात ज्या काही मागण्या द्राक्ष बागात दराने केलेल्या आहेत त्या सर्व मागण्यांचा स्वीकार करून त्या मागण्या शासन स्तरावर सकारात्मक दृष्टीने मांडून बागायतदाराच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी मंत्री श्री. भरणे यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या कामाचे कौतुक केले. तसेच संघटनेच्या वतीने आयोजित हे चर्चासत्र म्हणजे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मेजवानीच असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चासत्राचा उपयोग करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष श्री. भोसले यांनी सीना नदी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी, 10 एचपी मोटारीसाठी वीज मोफत द्यावी, क्रॉप कव्हर साठी 50 टक्के अनुदान अशा मागण्या करून त्या शासनाने सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DattatrayBharne
Previous Post

पुण्यात काँग्रेसला अजित दादांचा मोठा धक्का!

Next Post

राज्यातील कृषी विद्यापीठांत कृषी नवोन्मेष व विकासासाठी १२ ‘सिडसा’ केंद्रे स्थापन करण्यास मंजूरी-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

Next Post
राज्यातील कृषी विद्यापीठांत कृषी नवोन्मेष व विकासासाठी १२ ‘सिडसा’ केंद्रे स्थापन करण्यास मंजूरी-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

राज्यातील कृषी विद्यापीठांत कृषी नवोन्मेष व विकासासाठी १२ ‘सिडसा’ केंद्रे स्थापन करण्यास मंजूरी-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.