अहमदनगर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. १३ जुन २०२१
अहमदनगर जिल्हा परिषदेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हाभर मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. सगळेच राजकीय पक्ष ही निवडणूकीची तयारी करीत आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत होणा-या घडामोडींकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या राहुरी तालुक्यातील नांदुर जिल्हा परिषद गटातील राजकारण जोरात तापले आहे. त्यासंदर्भात नामदार प्राजक्त तनपुरे यांनी धनराज गाडे व धीरज भैय्या पानसंबळ या दोन इच्छुकांमध्ये समझोता करण्यासाठी बैठक घेतल्याची चर्चा राहुरीच्या राजकारणात सुरु आहे.
येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत राहुरी तालुक्यातील नांदुर गटात सर्वाधिक चुरस होणार आहे. या गटातून शिवाजीराजे गाडे यांचे चिरंजीव धनराज गाडे हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज भैय्या पानसंबळ यांनी ही या गटात वर्षभरापासून जोरदार तयारी केली आहे. नांदुर गटात वेगवेगळे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून भैय्या पानसंबळ घरोघरी पोहचले आहेत. तेंव्हा, राष्ट्रवादी काँगेस पक्षातील या दोन्ही इच्छुकांमूळे नामदार प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. एकाला तिकिट दिले तर दुसरा नाराज होणारच याचा विचार करुन नामदार तनपुरे आतापासून कामाला लागले आहेत.
नामदार तनपुरे यांनी नुकतीच विद्ममान जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धीरज भैय्या पानसंबळ यांची नांदुर गटातील निवडणूकीसंदर्भात गोपनीय बैठक घेतली असल्याचे समजतंय. या बैठकीमध्ये नांदुर गटातील संभाव्य उमेदवारीसंदर्भात सविस्तर चर्चा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नामदार प्राजक्त तनपुरे हे धीरज भैय्या यांना निवडणूीतून माघार घ्यावी अशी समजूत घालत असल्याची चर्चा आहे. मात्र, पानसंबळ हे निवडणूक लढविण्याच्या विचारावर ठाम असल्याचे ही समजते.
धीरज भैय्या पानसंबळ हे नामदार तनपुरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामूळे पानसंबळ यांना कदाचित नामदार तनपुरे सांगतील तसा निर्णय घ्येण्याचे दडपण ही असू शकते. गाडे हेही नामदार तनपुरे यांच्या जवळचे व राष्ट्रवादीनिष्ठ आहेत. त्यामूळे, नामदार तनपुरे हे या गटातील तिढा कसा सोडवितात हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामूळे गेली वर्षभर जोरदार तयारी करीत असलेले धीरज भैय्या पानसंबळ हे निवडणूक लढविणार की निवडणूकीतून माघार घेऊन शांत बसणार हे पहावे लागणार आहे.
मामा भाच्यासाठी किती जोर व कशी फिल्डिंग लावणार.
तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष चाचा तनपुरे हे धीरज भैय्या पानसंबळ यांचे सख्खे मामा आहेत. ते नामदार तनपुरे यांचे पारंपारिक विरोधक म्हणून ही ओळखले जातात. तसेच, चाचा तनपुरे हे भारतीय जनता पार्टीचे काम करीत आहेत. त्यामूळे मामा भाच्याला नांदुर जिल्हा परिषद गटातून तिकिट मिळवून देण्यासाठी किती जोर व कशी फिल्डिंग लावणार याची ही सद्धा चर्चा सुरु आहे.
मात्र, राहुरी तालुक्याच्या राजकीय पटलावर नांदुर गटातील निवडूकीचे नक्कीच पडसाद उमटू शकतात हे नक्की आहे. नामदार तनपुरे यांना सर्वांना सोबत घेऊन निवडणूकीची व्युहरचना आखताना प्रचंड कसरत करावी लागणार आहे हे आताच स्पष्ट होत आहे.
येथे कमेंट करावी