DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पद्मभूषण पुरस्काराने गौरवलेल्या आणि चाहत्यांच्या मनातील हिरो धर्मेंद्र यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही?

जाणून घ्या खरे कारण!

DD News Marathi by DD News Marathi
November 25, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
पद्मभूषण पुरस्काराने गौरवलेल्या आणि चाहत्यांच्या मनातील हिरो धर्मेंद्र यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही?

मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ नोव्हेंबर २०२५

बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत असून, एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. ३१ ऑक्टोबरला श्वसनासंबंधी त्रास जाणवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असली तरी नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि देओल कुटुंबाने त्यांच्यावर घरीच उपचार चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र काल त्यांच्या जीवनप्रवासाचा शेवट झाला.

धर्मेंद्र यांनी १९६५ मध्ये अभिनयाला सुरुवात केली आणि ७०–८० च्या दशकात त्यांनी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण प्रदान केला होता. साधारणतः अशा उच्च नागरी सन्मानप्राप्त व्यक्तींच्या निधनानंतर त्यांना शासकीय आदरांजली दिली जाते. परंतु धर्मेंद्र यांच्या बाबतीत तसे झाले नाही, हे पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले.

मग त्यांना शासकीय इतमाम का मिळाला नाही?
यामागचे कारण आता स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती प्रशासनापर्यंत उशिरा पोहोचली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायचे असल्यास कुटुंबीयांकडून सरकारला प्रस्ताव सादर करावा लागतो आणि त्यानंतर मंजुरी देण्याची एक संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया वेळखाऊ असते.

परंतु देओल कुटुंबाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. याशिवाय, त्यांच्या निधनाची बातमी माध्यमांमध्येही उशिराने आली आणि अंत्यसंस्कार देखील अत्यंत घाईघाईत पार पडले. त्यामुळे शासकीय पद्धतीने मानवंदना देणे शक्य झाले नाही.

या कारणांमुळे पद्मभूषण धर्मेंद्र यांना सरकारी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला नाही.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

कोयता गॅंगची धू धू धुलाई!

Next Post

TRAI ने तब्बल 21 लाख मोबाइल नंबर केले बंद!

Next Post
TRAI ने तब्बल 21 लाख मोबाइल नंबर केले बंद!

TRAI ने तब्बल 21 लाख मोबाइल नंबर केले बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.