DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“संघर्षातून उभी राहिलेली निर्मिती, या मंदिरावरील ध्वजाची कहाणी!”

राम मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकावल्यानंतर पंतप्रधान मोदींचे भाषण. 

DD News Marathi by DD News Marathi
November 25, 2025
in महाराष्ट्र
0
“संघर्षातून उभी राहिलेली निर्मिती, या मंदिरावरील ध्वजाची कहाणी!”

अयोध्या प्रतिनिधी :
दि. २५ नोव्हेंबर २०२५

अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवण्याचा ऐतिहासिक सोहळा आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिरासमोर हात जोडून वंदन केले. वैदिक मंत्रोच्चारांच्या वातावरणात, विशेष मुहूर्तावर झालेल्या या ध्वजारोहणामुळे संपूर्ण रामनगरी सणासारखी उजळून निघाली. त्यानंतर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.

ते म्हणाले, “आज अयोध्येत भारतीय संस्कृतीचा नवा वैभवकाळ सुरू झाल्याचे आपण पाहत आहोत. श्रीराम जन्मभूमी मंदिरावर ध्वज उभारणे हा एक अत्यंत पावन आणि अनुपम क्षण आहे. हा केवळ एक ध्वज नाही—तर भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा प्रतीक आहे. हा ध्वज अनेक वर्षांच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या साधनेची गोषवारा सांगतो. दशकानुदशके मनात ठेवलेले स्वप्न आज साकार झाले असून, साधूसंतांची तपस्या आणि समाजाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले,” असे मोदी म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितले,
“असंख्य वर्षांचे दुःख आज संपले, दीर्घकाळापासूनचे ध्येय पूर्ण झाले. ५०० वर्षांपूर्वी पेटलेली यज्ञज्वाला आज पूर्णत्वास गेली. श्रद्धा कधी डळमळली नाही, विश्वास कधी कमी झाला नाही—हा ध्वज त्याच विश्वासाची पूर्णाहुती आहे. भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह, ‘ओम’ ची आकृती आणि वृक्षाची प्रतीकं—हे सर्व रामराज्याच्या तेजाचे दर्शन आहेत. हा ध्वज म्हणजे संकल्प, साधना आणि संघर्षातून उभी राहिलेली निर्मिती.”

यानंतर सामाजिक मूल्यांवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले,
“आपण असे समाज निर्माण करूया जिथे कोणीही गरीब, दुःखी किंवा असहाय्य नसेल. जे लोक मंदिरात प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत, पण दूरून या ध्वजाला नमस्कार करतात, त्यांनाही तितकाच पुण्यभाव मिळतो. हा ध्वज रामललाच्या जन्मभूमीचे प्रतीक आहे आणि जगभरातील करोडो रामभक्तांना प्रेरणा देईल.”

पंतप्रधानांनी मंदिराच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या प्रत्येक दात्यांचे, कामगारांचे, वास्तुविशारदांचे आणि नियोजकांचे मनापासून अभिनंदन केले. त्यांनी रामकथेतील विविध उदाहरणे देत सांगितले की, समाजाच्या सामूहिक शक्तीनेच भारत विकसित राष्ट्र बनू शकतो.

अयोध्येत उभारण्यात आलेली सप्तस्थळे—निषादराज, शबरी, वशिष्ठ, अहिल्या, अगस्त्य, तुलसीदास, विश्वामित्र—यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की लहान कृतीही मोठ्या उद्दिष्टांना आधार देतात.
“राम केवळ कुल पाहत नाहीत, ते भक्तीला महत्त्व देतात. त्यांना वंश नाही, मूल्ये प्रिय असतात,” असे ते म्हणाले. महिलांच्या, दलित समाजाच्या, युवांच्या आणि वंचितांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून देश पुढे जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले,
“२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा आपला संकल्प आहे. रामाचे आदर्श आत्मसात केल्याशिवाय आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला सशक्त केल्याशिवाय राष्ट्रनिर्मिती शक्य नाही. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच पुढील हजार वर्षांसाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो.”

२५ नोव्हेंबरच्या या ऐतिहासिक दिवशी धर्मध्वजावर कोविदार वृक्षाचे चिन्ह कोरले गेल्याचेही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आणि हा दिवस भारतीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा अभिमान वाढवणारा असल्याचे सांगितले.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

TRAI ने तब्बल 21 लाख मोबाइल नंबर केले बंद!

Next Post

मामा-मामीकडून पाच वर्षांच्या चिमुकलीची फक्त 90 हजारांसाठी विक्री!

Next Post
मामा-मामीकडून पाच वर्षांच्या चिमुकलीची फक्त 90 हजारांसाठी विक्री!

मामा-मामीकडून पाच वर्षांच्या चिमुकलीची फक्त 90 हजारांसाठी विक्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.