DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मामा-मामीकडून पाच वर्षांच्या चिमुकलीची फक्त 90 हजारांसाठी विक्री!

मुंबईत धक्कादायक घटना.

DD News Marathi by DD News Marathi
November 26, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
मामा-मामीकडून पाच वर्षांच्या चिमुकलीची फक्त 90 हजारांसाठी विक्री!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २६ नोव्हेंबर २०२५

मुंबईत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वाकोला येथील अवघ्या पाच वर्षांच्या मुलीचे मामा–मामीने अपहरण करून तिला केवळ ९० हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. यानंतर या मुलीची आणखी एका टोळीमार्फत १ लाख ९० हजार रुपयांत विक्री करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२२ नोव्हेंबर रोजी वाकोला परिसरातून ही चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी नोंदवली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गंभीर स्वरूपाचा गुन्हा लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी सात स्वतंत्र पथके तयार करून सर्वांना विविध जबाबदाऱ्या दिल्या. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सलग दोन दिवस शोधमोहीम राबवली. त्यातून एका संशयित रिक्षाचे वर्णन मिळाले. ती रिक्षा सांताक्रूझहून पनवेलकडे जाऊन पुन्हा परत आल्याचे समजले.

रिक्षाचा क्रमांक उपलब्ध नसला तरी वर्णनाच्या आधारे चालक लतीफ अब्दुल माजिद शेख याला शोधून काढण्यात आले. चौकशीत त्याने मुलीचे अपहरण तिच्याच मामाने—लॉरेन्स निकलेस फर्नांडिस—आणि मामी मंगल यांनी केल्याचे सांगितले. पनवेलमध्ये राहणाऱ्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी रूपाला ओळखीच्या करण मारुती सणस या तरुणाला ९० हजारांत विकल्याची कबुली दिली.

दुप्पट भावात पुढची विक्री

करणला अटक केल्यानंतर त्याने दोन महिलांची नावे उघड केली. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने रूपाला वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर यांना १ लाख ९० हजार रुपयांत विकले होते. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी वृंदाला पकडले आणि तिच्याकडून चिमुकलीची सुखरूप सुटका केली. मुलीला परत सांताक्रूझ येथील घरी आणून आईच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणात लॉरेन्स, मंगल, लतीफ, करण आणि वृंदा या पाच जणांना अटक करण्यात आली असून अंजलीचा शोध सुरू आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

“संघर्षातून उभी राहिलेली निर्मिती, या मंदिरावरील ध्वजाची कहाणी!”

Next Post

रोहित शर्माचे अधुरे स्वप्न सूर्यकुमार यादव पूर्ण करणार!

Next Post
रोहित शर्माचे अधुरे स्वप्न सूर्यकुमार यादव पूर्ण करणार!

रोहित शर्माचे अधुरे स्वप्न सूर्यकुमार यादव पूर्ण करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.